petrol pump: पेट्रोल पंप चालकांकडून आज इंधन खरेदी बंद आंदोलन!

मागील काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलचे भाव (Petrol Diesel) गगनाला भिडले आहेत. वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या किमतींमुळे वाहनचालक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीमध्ये आज (मंगळवारी) राज्यभरातील पेट्रोल पंप (petrol pump) चालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पेट्रोल, डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात आज आणि उद्या पेट्रोल-डिझेलचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.

डीलर मार्जिन/कमिशनमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी पेट्रोल पंप मालकांनी आज मंगळवारी एका दिवसाचं (petrol pump) आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनाच्या घोषणेनंतर वाहनधारकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, पेट्रोल पंप चालकांनी हे आंदोलन पुकारलं असलं तरी, ग्राहकांना मात्र या आंदोलनाचा फटका बसणार नाही , इंधन विक्री या पंपांवर नियमित सुरू राहणार आहे.

दुसरीकडे आंदोलनात इंधन खरेदी न केल्यामुळे सरकारला मात्र नुकसान होऊ शकतं , एक दिवसाचं इंधन विक्रीच्या कर स्वरूपातून मिळणार महसूल बुडणार आहे. पेट्रोल विक्रेत्यांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये शेवटची वाढ ही २०१७ मध्ये करण्यात आली होती. मात्र त्यानंतर महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तरी देखील कमिशनमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

सध्या डिलर्सला एक लिटर पेट्रोलमागे २ रुपये २० पैसे तर डिझेलसाठी १ रुपया ८० पैसे कमशिन मिळते. मात्र यामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी डिलर्सकडून करण्यात आली आहे. तसेच केंद्राने अचानक केलेल्या एक्साइज ड्यूटीमधील कपातीमुळे नुकसान झाल्याचा आरोप देखील पेट्रोल पंप चालकांकडून करण्यात आला आहे. दुसरीकडे वाढत्या महागाईमुळे तेल कंपन्यांनी डिलर्सना उधारीवर पेट्रोल-डिझेलचा पुरवठा बंद केला आहे. परिणामी उरण परिसरात इंधनाचा तुटवडा जाणवत असून, पेट्रोल-डिझेल अभावी अनेक वाहने विविध रस्त्यावर अडकून पडली आहे.

जेएनपीएअंतर्गत असलेल्या विविध बंदरातून दररोज १७ हजार कंटेनर मालाची आयात, निर्यात होत असते. मात्र तेल कंपन्यांनी उधारीवर पेट्रोल, डिझेल देणे बंद केल्याने गेल्या शनिवारपासून उरण परिसरात पेट्रोल, डिझेलची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. याचा मोठा फटका हा या परिसरातील वाहतूक व्यवस्थेला बसला आहे.

हेही वाचा :


shriya pilgaonkar : रंगबेरंगी ड्रेसमध्ये सचिनच्या कन्येचं फोटोशूट!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *