पोस्टाच्या `या` बचत योजनेत पैसे होणार दुप्पट…

investment scheme

अलीकडच्या काळात लोकांचा बचतीकडे (Savings) कल वाढलेला आहे. मुलांचं शिक्षण, स्वमालकीचं घर, आजारपण, सेवानिवृत्तीनंतर पैशांची तजवीज, पर्यटन आदी कारणांसाठी लोक बचतीवर भर देताना दिसतात. सध्या बचतीसाठी (investment scheme) अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पोस्ट ऑफिस (Post Office), बॅंकांच्या (Bank) विविध योजना, म्युचुअल फंड (Mutual Fund) आदींचा यात समावेश होतो.

पोस्टाच्या लघु बचत योजनांमध्ये (Small Saving Schemes) किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) हा बचतीसाठी उत्तम पर्याय आहे. या योजनेत पैसे गुंतवल्यास 124 महिने म्हणजेच 10 वर्ष 4 महिन्यांत ते दुप्पट होतात.

जर तुम्ही एखाद्या बॅंकेच्या बचत योजनेत पैसे गुंतवले आणि बॅंक डिफॉल्ट (Default) झाली तर तुम्हाला 5 लाखांपर्यंतची रक्कम परत मिळते. पण पोस्ट ऑफिसच्या बाबतीत असं होत नाही. पण पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत तुम्ही अगदी कमी रकमेपासून गुंतवणूक करता येते. पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र या योजनेचा विचार करता, यातील बचतीवर सध्या वार्षिक 6.9 टक्के व्याजदर (Interest Rate) उपलब्ध आहे. हा व्याजदर 1 एप्रिल 2020 पासून लागू आहे. या योजनेतील व्याज वार्षिक आधारावर चक्रवाढ पद्धतीने दिलं जातं.

किसान विकास पत्र योजनेचं अकाउंट (investment scheme) काही अटींच्या अधीन राहून मुदतपूर्ती पूर्वी कधीही बंद करता येतं. सिंगल अकाउंट होल्डर किंवा जॉईंट अकाउंट (Joint Account) असेल तर खातेदाराच्या मृत्यूनंतर हे अकाउंट बंद करता येतं. याशिवाय, अकाउंटमध्ये रक्कम जमा केल्याच्या तारखेपासून दोन वर्षं सहा महिन्यांनंतर अथवा न्यायालयाच्या आदेशानं अकाउंट बंद केलं जाऊ शकतं.

पोस्टाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक प्रौढ आणि तीन प्रौढ व्यक्ती संयुक्तपणे जॉईंट अकाउंट उघडू शकतात. या योजनेंतर्गत अल्पवयीन किंवा मानसिक आजार असलेल्या व्यक्ती त्यांच्या पालकांमार्फत अकाउंट उघडू शकतात. किसान विकास पत्र या लघु बचत योजनेत किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करता येते.

पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करावी लागते. या योजनेत बचतीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही. या योजनेतून जमा केलेली रक्कम अर्थ मंत्रालयाने ठेवीच्या तारखेपासून वेळोवेळी विहित केलेल्या मुदतपूर्तीच्या कालावधीनुसार मॅच्युअर (Mature) होते. एकूणच पोस्टाची किसान विकास पत्र ही योजना बचतीसाठी सुरक्षित आणि चांगला परतावा देणारी आहे.


हेही वाचा :


पालकमंत्री सतेज पाटील यांचा चंद्रकांत पाटीलवर पलटवार…


कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुक १७ उमेदवारांचे अर्ज वैध…


CSK vs KKR – आजची मॅच कोण जिंकणार ? तुमचे मत नोंदवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *