Yes Bank कडून ग्राहकांना धक्का, मुदतपूर्व FD काढण्याच्या दंडात केली वाढ

FD

Yes Bank कडून आपल्या ग्राहकांना एक झटका दिला गेला आहे. वास्तविक बँकेने आता FD च्या खात्यातून मॅच्युरिटी आधीच पैसे काढण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दंडात वाढ केली आहे.

16 मे 2022 पासून हे नवीन शुल्क लागू केले जाईल, असे बँकेने म्हंटले आहे.

यापूर्वी 181 दिवसांपेक्षा कमी कालावधीच्या FD साठी मॅच्युरिटी आधीच पैसे काढण्यासाठी कोणताही दंड आकारला जात नव्हता. मात्र Yes Bank आता ग्राहकांकडून 0.25% शुल्क आकारणार आहे. 182 दिवस किंवा त्याहून अधिकच्या कालावधीच्या FD वरील दंड 0.5 टक्क्यांवरच ठेवण्यात आला आहे. अशातच, 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ग्राहकांना मुदती आधीच काढण्याच्या दंडातून सूट देण्यात आली आहे.

> मॅच्युरिटी आधीच पैसे काढण्याचा दंड सर्व प्रकारच्या ग्राहकांना लागू होईल.
>> 5 जुलै 2019 ते 9 मे 2022 या कालावधीत FD अकाउंट उघडल्या किंवा रिन्यूअल केलेल्या येस बँकेच्या कर्मचाऱ्यां कडूनही मॅच्युरिटी आधीच पैसे काढण्यासाठी दंड आकारला जाईल. मात्र, 10 मे 2021 रोजी किंवा नंतर उघडलेल्या किंवा रिन्यूअल अकाउंटसाठी कोणताही दंड आकारला जाणार नाही.
>> थोडे किंवा पूर्ण पैसे काढण्यासाठी मॅच्युरिटी आधीच पैसे काढण्याचा दंड आकारला जाईल.
>> फॉरेन करन्सी नॉन रेसिडन्स अकाउंट (FCNR) आणि RFC मधील FD वर मॅच्युरिटी आधीच पैसे काढण्यासाठी कोणताही दंड आकारला जाणार नाही.

Smart News:-

राज्यातील कोरोना रुग्णसंख्या स्थिर, आज 231 नव्या रुग्णांची भर


बाळाचं नाव विचार करुन सरकारी नोंदणीत एकदाच नोंदवा


ब्रॅडन मॅक्युलम इंग्लंडच्या कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक; ECB ची घोषणा


वानखेडे स्टेडियमची बत्ती गूल, MI vs CSK मॅच DRS शिवाय सुरू!


कॉंग्रेसचे तीन दिवसीय चिंतन शिबिर उद्यापासून


 

Leave a Reply

Your email address will not be published.