कर्ज देवाण-घेवाण करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी..!

आजकाल देशात अनेक असे ऍप तयार उपलब्ध असून जे ग्राहकांना काही मिनिटात कर्ज देतात. हे ऍप एका झटक्यात लोन देतात. परंतू वसुली करताना ते मनमानी करतात अशा तक्रारी ग्राहकांकडून येत आहेत. अनेकदा त्यांना गरजेपेक्षा जास्त भरणा करावा लागतो. ग्राहकांच्या या अडचणी सोडवण्यासाठी रिझर्व बँकेने तयारी सुरू केली आहे.अशा प्रकारचे ऍप आणि त्यांच्या मनमानील आळा घालण्यासाठी (reserve bank of india) भारतीय रिझर्व बँक डिजिटल लेंडिंग बाबत नवीन पॉलिसी लॉंच करणार आहे.

आरबीआय गव्हर्नर यांची माहिती

चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीनंतर माहिती देताना, RBI (reserve bank of india) चे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, येत्या दोन महिन्यांत डिजिटल कर्जाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील.

यामुळे मनमानी वसुली करणार्‍या कंपन्यांवर त्वरीत कर्ज देणाऱ्या कंपन्यांच्या मनमानी वसुलीला आळा बसेल. शक्तिकांता दास म्हणाले की, डिजिटल कर्ज देण्याबाबत प्राप्त झालेल्या शिफारसी तपासण्याचे काम पूर्ण झाले आहे. आणि लवकरच याबाबत चर्चा करून मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील.

हेही वाचा :


टॉपलेस होऊन महिला Live सामन्यात मैदानात घुसली… व्हिडिओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *