महिलांसाठी SBI ची खास ऑफर, स्वत:च्या घराचं स्वप्न होईल पूर्ण!

सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांना कमी व्याजदरात होम लोन (Home Loan) देत आहे. SBI च्या म्हणण्यानुसार, जर  कर्ज घेणारी महिला असेल तर ती इतर फायद्यांव्यतिरिक्त सवलतींचा लाभ देखील घेऊ शकते. म्हणजेच तिला कमी व्याजदराने कर्ज मिळेल. हे होम लोन क्रेडिट स्कोअरशी (Credit Score) लिंक आहे. याचाच अर्थ तुमचा क्रेडिट स्कोअर जितका चांगला असेल तितकी कर्जाची रक्कम जास्त असेल.

एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. बँकेने आपल्या अधिकृत हँडलवर केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, SBI होम लोनसह तुमचे स्वप्नातील घर मिळवा. 18 ते 70 वर्षे वयोगटातील लोक लोन घेऊ शकतात. SBI च्या नियमित होम लोनमध्ये Flexipay, NRI होम लोन, गैर-पगारदारांना लोन, डिफ्रेन्शियल ऑफरिंग, विशेषाधिकार, शौर्य आणि अपना घर यांचा समावेश आहे.(credit score)

होम लोन मिळवण्यासाठी अटी काय?

लोनसाठी अर्ज करणारी व्यक्ती ही भारताची रहिवासी असावी. वय किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 70 वर्षे असावा. कर्जाचा कालावधी 30 वर्षे असेल.

SBIचा नवीन व्याजदर

स्टेट बँक ऑफ इंडिया वार्षिक 6.65 टक्के दराने होम लोन देत आहे. तुम्ही घेणार त्या रकमेवर तुम्हाला 6.65 टक्के वार्षिक व्याज द्यावं लागेल.

होम लोनचे फायदे

होम लोन ग्राहकाच्या महत्वाच्या गरजा पूर्ण करतात आणि त्याचे अनेक फायदे आहेत. त्यातले काही फायदे खालीलप्रमाणे –

-तुम्हाला होम लोन कमी व्याजदरात मिळतं. त्यामुळे घेतलेल्या रकमेवर जास्त व्याज द्यावं लागत नाही आणि पैशांची बचत होते.

-महत्वाचं म्हणजे SBI चं होम लोन मिळवायचं असेल तर त्यासाठी प्रक्रिया शुल्क (Processing Fee) खूप कमी आहे.

-एसबीआय लोन देताना कोणतेही अप्रत्यक्ष शुल्क आकारत नाही

-तसेच एसबीआय होम लोनवर प्रीपेमेंट चार्ज देखील आकारत नाही

-होम लोन देताना बँक तुमच्याकडून कोणतेही छुपे शुल्क आकारत नाही

-महत्वाचं म्हणजे तुम्हाला होम लोनची परतफेड करण्यासाठी मोठा कालावधी मिळतो. त्यामुळे तुम्ही कर्जाची परतफेड तब्बल 30 वर्षांपर्यंत करू शकता.

-होमलोन ओव्हरड्राफ्टच्या स्वरूपातही उपलब्ध आहे.

-शिवाय जर महिलांना घर खरेदी करायचं असेल तर त्यांच्यासाठी आणखी सवलती आहेत. सर्वसामान्य होम लोनपेक्षा घर खरेदी करणाऱ्या महिलांसाठी होम लोनचा व्याजदर कमी असेल.

तुम्ही घर खरेदी करण्यासाठी होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर एसबीआय खूप चांगल्या सवलती देत आहे. शिवाय महिला खरेदीदारांसाठी तर लोनचा व्याजदर सर्वसामान्य दरांपेक्षा कमी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *