बंपर रिटर्न; 52 दिवसात 44 रुपयांचा ‘हा’ शेअर 530 रुपयांवर!

शेअर बाजारातून (Share Market) मोठी कमाई करायची असेल आणि मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल तर ही बातमी फायदेशीर ठरू शकते. 2021 प्रमाणेच या वर्षीही काही मल्टीबॅगर स्टॉक्सने मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे.
एसईएल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड (SEL Manufacturing Company Ltd) या कापड कंपनीच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा दिला आहे. 52 दिवसांत गुंतवणूकदारांना 1000 टक्क्यांहून अधिक परतावा जर आपण या शेअरची प्राईज हिस्ट्री पाहिली तर या कंपनीचे शेअर्स 44.40 रुपये (3 जानेवारी 2022) वरून 529.55 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या शेअरने 2022 मध्ये आतापर्यंत तब्बल 1092.68 टक्के परतावा दिला आहे. याचा अर्थ असा की SEL मॅन्युफॅक्चरिंगच्या शेअरने यावर्षी आतापर्यंतच्या 52 ट्रेडिंग सत्रांमध्ये गुंतवणूकदारांना 1000 टक्क्यांहून अधिक नफा दिला आहे.(share market)
यावर्षी जर कुणी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज ते 11.92 लाख रुपये झाले असते. GST दर रचनेत मोठा बदल होण्याची शक्यता, 12 आणि 18 टक्क्यांचा मिळून एकच 15 टक्क्यांचा स्लॅब येणार 5 महिन्यांपूर्वी 27 ऑक्टोबर 2021 रोजी कंपनीचा स्टॉक फक्त 35 पैसे होता. 15 मार्च 2022 रोजी बंद झालेल्या ट्रेडिंग आठवड्यात स्टॉक 480.35 रुपयांच्या पातळीवर गेला. महिनाभरापूर्वी हा शेअर 199.90 रुपयांच्या पातळीवर होता, तो आता 480.35 रुपयांवर पोहोचला आहे.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने पाच महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये 10 हजार रुपये गुंतवले असते, तर आज ही रक्कम 1.37 कोटी रुपये झाली असती. Paytm शेअरमध्ये घसरण सुरुच, तज्ज्ञांच्या मते आणखी किती घसरण शक्य आहे? कंपनीचे 8 प्रमोटर आहेत ज्यांची एकूण हिस्सेदारी 75.27 टक्के आहे. याशिवाय, 16521 पब्लिक शेअरहोल्डर्सकडे कंपनीत एकूण 24.73 टक्के हिस्सा आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत विदेशी गुंतवणूकदारांनी कंपनीचे 42,178 शेअर ठेवले आहेत. मात्र ज्या शेअर्समध्ये सार्वजनिक भागधारकांची हिस्सेदारी कमी आहे, त्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी अतिशय काळजीपूर्वक गुंतवणूक करावी. गेल्या अनेक आर्थिक वर्षांपासून कंपनी सातत्याने तोटा सहन करत आहे.
हेही वाचा :