Share Market : शेअर बाजारात हाहाकार!

सलग चार दिवसांच्या सुट्टीनंतर (share market current news) आज सोमवारी खुल्या झालेल्या शेअर बाजारात (Share Market) मोठी घसरण झाली. सेन्सेक्स (BSE Sensex) तब्बल १२०० अंकांनी कोसळला. तर निफ्टी (NSE Nifty) ३०० हून खाली आला. कमकुवत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजार गडगडला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स १२०० अंकांनी खाली येऊन ५७ हजारांवर व्यवहार करत होता. तर निफ्टी ३२७ अंकांनी खाली येऊन १७ हजारांवर व्यवहार करत होता. सेन्सेक्सच्या घसरणीत HDFC Bank आणि Infosys या दोन कंपन्यांच्या स्टॉक्सचे प्रमाण सुमारे ५०० अंकांहून अधिक होते.
इन्फोसिसच्या शेअर्समध्ये ९ टक्क्यांची घसरण झाल्याचे दिसून आले. Infosys, या भारतातील दुसऱ्या क्रमाकांच्या सॉफ्टवेअर सेवा देणाऱ्या कंपनीने ३१ मार्च रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत ७४४.०५ डॉलर दशलक्ष एढा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला. पण मार्च महिन्यातील नफ्याच्या तुलनेत हा नफा कमी आहे.(share market current news)
एचडीएफसी बँक आणि इन्फोसिसच्या उलाढालीचे तिमाही आकडे बाजारातील अपेक्षेपेक्षा कमी राहिले. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाल्या. याच पडसाद आज शेअर बाजारात दिसून आल्याचे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा :