शेअर बाजारात पुन्हा घसरण…

share market

share market: एक आठवडाभर झालेल्या सातत्यपूर्ण घसरणीनंतर काल शेअर बाजारात तेजी दिसून आली होती, मात्र आजच्या दिवसाची सुरुवात पुन्हा घसरणीने झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी आज गॅप डाऊन ओपनिंग दिलं. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स 372.93 अंकांनी घसरून 56,983.68 वर सुरु झाला तर निफ्टी 127.45 अंकांनी घसरून 17,073.35वर सुरु झाला. निफ्टी 50 मधील केवळ 6 शेअर्समध्ये आज वाढ झाल्याचे दिसून आली तर 44 शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली.

तत्पूर्वी काल मंगळवारी 2 दिवसांनंतर शेअर बाजारात (share market) तेजी दिसून आली. सेन्सेक्स 776 अंकांनी वाढला, तर निफ्टी 17200 च्या पातळीवर बंद झाला, बीएसईचे सर्व सेक्टरल इंडेक्स तेजीत होते. दुसरीकडे, निफ्टी 246.85 अंकांच्या अर्थात 1.46 टक्क्यांच्या वाढीसह 17,200.80 वर बंद झाला.

मंगळवारी ऑटो, रियल्टी, एफएमसीजी सेक्टर्समध्ये खरेदी दिसून आली. फार्मा, पीएसई शेअर्समध्ये चांगली खरेदी झाली.

मंगळवारी शेअर बाजारात मंगलमय वातावरण दिसून आल्याचे मोतीलाल ओसवालच्या शिवांगी सरडा म्हणाल्या. निफ्टी मध्ये 17172 च्या पातळीवर खरेदी करायला हवी असे मत त्यांनी नोंदवले. यात 17250 ची पातळीही दिसू शकते, सोबतच 17000 वर स्टॉपलॉस लावण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

मोतीलाल ओसवालच्या शिवांगी सरडा यांनी बँक निफ्टी मध्येही खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यात 36585 वर खरेदी करू शकता असे त्या म्हणाल्या. पण 36250 वर स्टॉपलॉस लावण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

Smart News:-

मनसेचा ‘आर’ प्लान!, राज ठाकरेंच्या सभेपूर्वी भोंगे खरेदी


Malaika Arora अपघातानंतर दिसली ‘या’ ठिकाणी, खास व्यक्तींकडून जंगी स्वागत


Faf Du Plessis विराटबाबत असं का म्हणाला?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *