Share Market: शेअर बाजार सावरला!

सलग सहा दिवसांच्या घसरणीनंतर आज शेअर बाजाराची हिरव्या चिन्हात बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांत किरकोळ वाढीसह बंद झाले. (share market) आजच्या दिवसाच्या अखेर सेन्सेक्स 180.22 अंकांनी म्हणजेच 0.34 टक्क्यांनी वधारून 52,9973.84 वर सुरु झाला, तर निफ्टी 60.15 अंकांनी म्हणजेच 0.38 टक्क्यांनी वधारुन 15,842.30वर सुरु झाला.
तत्पूर्वी आजच्या दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स 52,946.32वर सुरु झाला, तर निफ्टी 15,845.10वर सुरु झाला. निफ्टी-50 मधील आयशर मोटर्स (EICHERMOT), जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL), टाटा स्टील (TATASTEEL), एल अॅण्ड टी (LT), मारूती (MARUTI) यांसह 28 शेअर्सनी सकारात्मक ओपनिंग दिलं, तर अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO), श्री सिमेंट (SHREECEM), डॉ. रेड्डी (DRREDDY), नेस्टले इंडिया (NESTLEIND), GRASIM सह 22 शेअर्सची सुरुवात घसरणीने झाले.(share market)
हेही वाचा :