‘एचडीएफसी’चे बँंकेत विलीनीकरण होणार..!शेअर आज प्रचंड वाढले!

गृहकर्ज पुरवठादारांपैकी आघाडीची वित्त संस्था असलेल्या हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स काॅर्पोरेशनचे (एचडीएफसी) एचडीएफसी बँकेत विलीनीकरण  होणार आहे. एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने या विलीनीकरणाला मंजुरी दिली असल्याचे कंपनीनं (shares of hdfc bank) शेअर बाजाराला कळवले आहे. या घोषणेनंतर आज सोमवारी शेअर बाजारात एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी या दोन्ही कपन्यांच्या शेअरमध्ये मोठी उसळी दिसून आली.

शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार एचडीएफसी ही दोन उपकंपन्यांना एचडीएफसी बँकेत विलीन करणार आहे. यातून एचडीएफसीचा एचडीएफसी बँकेत ४१ टक्के हिस्सा होईल. आर्थिक २०२४ च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईल, असे कंपनीनं म्हटलं आहे.

एचडीएफसीच्या उपकंपनी असलेल्या एचडीएफसी इन्व्हेस्टमेंट लिमिटेड आणि एचडीएफसी होल्डिंग्ज लिमिटेड या दोन्ही कंपन्या एचडीएफसी बँकेत विलीन करण्यात येतील. विलीनीकरणाच्या प्रस्तावाला नुकताच एचडीएफसीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली. हे विलीनीकरण दोन्ही बरोबरीच्या कंपन्यांचे एकत्रीकरण असल्याचे मत एचडीएफसी अध्यक्ष दिपक पारेख यांनी सांगितले.

विलीनीकरणाची घोषणा झाल्यानंतर आज शेअर बाजारात त्याचे पडसाद उमटले. आज सकाळच्या सत्रात एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे. सध्या शेअर बाजारात एचडीएफसीचा शेअर तब्बल १३.४७ टक्के वाढ झाली आहे. तो सध्या २७८३ रुपयांवर आहे. आज एका शेअरमध्ये ३३० रुपयांची वाढ झाली. त्याशिवाय एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये देखील ९.५४ टक्के वाढ झाली आहे.
सध्या एचडीएफसी बँकेचा (shares of hdfc bank) शेअर १६५४ रुपयांवर असून त्यात १४७ रुपयांची वाढ झाली आहे.

हेही वाचा :


कोल्हापुरातील सैनिक टाकळीच्या युवकाचा निपाणीत निर्घृण खून!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *