शेअर बाजार अस्थिर राहण्याचे संकेत
शेअर बाजारात (stock market)आज किंचित चढ-उताराने सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स 57 अंकांच्या वाढीसह 60805 वर तर निफ्टी 20 अंकांच्या वाढीसह 18121 अंकांवर उघडला. त्याचवेळी बँक निफ्टी 59 अंकांच्या वाढीसह 42642 वर उघडला आहे.
सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 300 हून अधिक अंकांची घसरण(stock market) पाहायला मिळाली. मात्र, टाटा मोटर्स, टाटा स्टील, पॉवरग्रीड या शेअर्स मध्ये तेजी दिसून येत आहे. टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. त्याच वेळी, टीसीएसच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांहून अधिक घसरण होताना दिसत आहे.
सुरुवातीच्या सत्रात टाटा मोटर्स, टाटा स्टील, एम अँड एम, पॉवरग्रीड, सन फार्मा, टायटन, एचयूएल, एल अँड टी आणि कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये आज तेजीने व्यवहार करत आहेत. याशिवाय अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, ॲक्सिस बँक, एनटीपीसी, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, विप्रो, रिलायन्स, एचसीएल टेक, एशियन पेंट्स आणि आयसीआयसीआय बँक या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
हेही वाचा :