तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, चेक करा पेट्रोल-डिझेलचा तुमच्या शहरातील भाव

Smart News:- तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, चेक करा पेट्रोल-डिझेलचा तुमच्या शहरातील भाव

Smart News:- देशात सतत वाढत असलेल्या महागाईने लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, 21 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करून जनतेला मोठा दिलासा दिला होता.

त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. केंद्र सरकारने तेलावरील उत्पादन शुल्क कमी केले होते. यानंतर काही राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटही कमी केला. कच्च्या तेलाच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel Prices) जाहीर केले आहेत.

आजच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत पेट्रोल 109.27 रुपये प्रतिलिटर विकलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने (Central Government) उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7.50 रुपयांनी स्वस्त झाले होते. दरम्यान, कच्च्या तेलाने पुन्हा कंपन्यांवर किमती वाढवण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

>> मुंबई – पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल 95.84 रुपये प्रति लिटर
>> दिल्ली – पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
>> चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
>> कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.
तुम्ही नवीन दर याप्रमाणे जाणून घेऊ शकता तुम्ही SMS द्वारे पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे (Indian Oil) ग्राहक आरएसपी 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Smart News:-

लोन ॲपच्या जाळ्यात व्यापारी; ‘हॅप्पी वॉलेट’ ॲपकडून व्यापाऱ्याचे मॉर्फ फोटो व्हायरल!


ही अनोखी बादली Amazon वर विकली जात आहे 25,999 रुपयांना! लोक म्हणाले- याच्यासाठी विकावी लागेल किडनी


अॅपलनं आणली पाण्याची बाटली…


लिंबूशिवाय ‘या’ फळांतूनही मिळते पुरेसे ‘सी व्हिटॅमिन’; जाणून घ्या


 

Leave a Reply

Your email address will not be published.