UPI Payment करताना ‘ही’ चूक कधीही करु नका, जाणून घ्या माहिती

Smart News:- UPI Payment करताना 'ही' चूक कधीही करु नका, जाणून घ्या माहिती

Smart News:- आजच्या काळात बँकेशी संबंधीत सर्व व्यवहार आपण ऑनलाईनच करतो. यामुळे लोकांचा वेळही वाचतो, तसेच कधीही कोणत्याही वेळेस पैसे पाठवणे किंवा घेणे सोपं झालं आहे. त्यात यूपीआय पेमेंट्सचा पर्याय हा पैसे पाठवण्याचा किंवा घेण्यातचा एक अतिशय सोपा मार्ग आहे. ज्यामध्ये फक्त मोबाईल नंबर टाकून किंवा एक कोड स्कॅन करुन तुम्ही कोणालाही पैसे पाठवू शकता.

सध्या लोक पानपट्टीपासून ते भाजीवाल्यांपर्यंत सर्वांनाच UPI च्या मार्गाने पैसे देत आहेत. ज्यामुळे पैसे जवळ ठेवण्याची कटकट संपली आहे.

परंतु UPI पेमेंट करताना लोकं बऱ्याचदा अशा चुका करतात की, ज्यामुळे त्यांचं खातं रिकामी होऊ शकतं. त्यामुळे  UPI पेमेंट करताना काय करावं आणि काय करु नये हे जाणून घ्या.

पेमेंट करण्यापूर्वी यागोष्टी तपासा

UPI पेमेंट करण्यापूर्वी तुम्ही कोणाला पेमेंट करत आहात? त्यांचं नाव नक्की तपासा. आपण कोणाला पैसे देत आहोत, हे जाणून घेणं फार महत्वाचे आहे.

त्यामुळे मेल किंवा मेसेजवरुन शेअर केलेल्या नंबरबर पैसे पाठवण्यापूर्वी नावाची खात्री करा किंवा प्राप्त करण्यापूर्वी, तो नंबर कोणाचे आहेत ते तपासा. कारण  बर्‍याच वेळा, मेलमध्ये येणारे फोन नंबर हे तुमच्या फोनमधील माहिती चोरण्यासाठी तयार केले जातात, ज्यामुळे अनेकांचं खातं रिकामी होऊ शकतं.

जर तुम्हाला कोणाकडून पैसे घ्यायचे असेल आणि कोणी तुम्हाला त्यांचा कोड स्कॅन करायला सांगितला किंवा तुमचा UPI पिन मागितला तर ते करु नका. हे लक्षात घ्या की, पैसे मिळवण्यासाठी UPI पिन किंवा कोड स्कॅन करण्याची गरज नाही.

UPI फसवणुकीशी संबंधित बहुतेक प्रकरणांमध्ये, असे दिसून आले आहे की, जर वापरकर्ते फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात सापडले तर ते त्यांच्या कष्टाने कमावलेले पैसे गमावतील.

या ऍप्सपासून दूर रहा

जर तुम्ही चुकून एखादे बनावट ऍप डाउनलोड केले, तर असे ऍप्स तुमचा वैयक्तिक डेटा चोरुन घेतात. जेणेकरून तुमच्या बँक खात्यात जमा केलेली रक्कम चोरीला जाऊ शकते.

सिटी बँकेच्या एका सल्लागाराकडून मोदी भीम, भीम मोदी ऍप, भीम पेमेंट-यूपीआय मार्गदर्शक, भीम बँकिंग मार्गदर्शक इत्यादी बनावट UPI ऍप्सपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

 

Smart News:-

‘या दोन टीमला तळाशीच राहू द्या, ते तिथंच चांगले दिसतात’; माजी क्रिकेटरचे अजब वक्तव्य


रणबीर आलियाच्या लग्नाचे खास क्षण,पहा फोटो…


घोरपडीवर बलात्कार, जंगलात नेमकं काय घडलं?


एनसीबीच्या विभागीय संचालकपदी अमित घावटे


केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अर्थ मंत्रालयाची मोठी घोषणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *