‘या’ योजनांमध्ये एक हजारापासून सुरुवात करा, मिळतील लाखो रुपये!

investment

जर तुम्ही नुकतीच एखादी नोकरी करण्यास सुरुवात केली असेल, तर तुम्ही (investment)गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकता. या योजना तुम्हाला तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करतील असे नाही, तर तुम्ही मोठ्या प्रमाणात बचत देखील करू शकता.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) :
तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये तुमची गुंतवणूक (investment) दरमहा १००० रुपये दराने सुरू करू शकता, अशा प्रकारे तुम्ही एका वर्षात दरमहा सुमारे १२ हजार रुपये वाचवाल. पीपीएफ (PPF) वर सध्याचा व्याजदर ७.१ टक्के आहे. तुम्ही पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यास, तुम्हाला प्राप्तिकराच्या कलम ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत सूट मिळते. पीपीएफचा लॉक-इन कालावधी १५ वर्षांचा असतो, पण सरकारी योजना असल्याने त्यात गुंतवणूक करणे पूर्णपणे सुरक्षित आहे.

उदाहरणार्थ, जर तुम्ही प्रति महिना १००० रुपये म्हणजेच १२ हजार रुपये प्रतिवर्ष असे १५ वर्षांसाठी गुंतवले, तर १.८ लाख रुपये तुमची मूळ रक्कम असेल. आणि ७.१ टक्के व्याजदराने या काळात तुम्हाला गुंतवणुकीवर १.४५ लाख व्याज मिळेल. अशा प्रकारे तुम्ही दरमहा १ हजार रुपये गुंतवून ३.२५ लाख रुपये जोडू शकता.

investment

आवर्ती ठेव (RD) :
तुम्ही कमी कालावधीसाठी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर रिकरिंग डिपॉझिट (RD) तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. बँक आणि पोस्ट ऑफिस दोन्हीमधून तुम्ही आरडी घेऊ शकता, पण बँकांच्या तुलनेत पोस्ट ऑफिसमध्ये व्याजदर जास्त आहे. एफडी आणि आरडी मधील सर्वात मोठा फरक म्हणजे एफडीमध्ये तुम्हाला संपूर्ण रक्कम जमा करावी लागते, तर आरडीमध्ये तुम्ही थोड्या रकमेने सुरुवात करू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये आरडीवर सध्याचा व्याज दर ५.८ टक्के आहे.

जर तुम्ही आरडीमध्ये दरमहा एक हजार रुपये म्हणजे प्रति वर्ष १२ हजार रुपये जोडले, तर ५ वर्षांत ६० हजार रुपये जमा होतील. सध्याच्या व्याजदरानुसार मोजले, तर ५ वर्षांत तुम्हाला ५९,६९४ रुपये व्याज मिळेल.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक
हा पर्याय इतर पर्यायांपेक्षा जास्त जोखमीचा आहे, पण गुंतवणूकदारांना त्यात अधिक फायदेही मिळतात. इंफ्टी इंडेक्स फंड (Infty Index Fund) ने गेल्या ५ वर्षांपासून दरवर्षी १२ ते १५ टक्के परतावा दिला आहे. तुम्ही इंडेक्स फंडातच ५ वर्षांसाठी दरमहा एक हजार रुपये गुंतवले, तर तुम्ही ६० हजार रुपये गुंतवाल. समजा या कालावधीत निफ्टी निर्देशांक सरासरी फक्त १० टक्के परतावा देतो, तर तुम्हाला गुंतवणुकीवर ५ वर्षांत ७८,०८२ रुपये नफा होईल.

तुम्ही १५ वर्षे म्युच्युअल फंडामध्ये दरमहा १००० रुपये गुंतवल्यास तुमची मूळ गुंतवणूक १.८ लाख होईल आणि त्यावर तुम्हाला १० टक्के दराने ४.१७ लाखांचा परतावा मिळेल.

हेही वाचा :


हा बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजूनही अविवाहित का आहे?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *