या शेअरमुळे छप्परफाड कमाई; दिवसात कमावले ५३४ कोटी रुपये!

nifty

शेअर बाजारात तेजीची लाट धडकली. गुरुवारी शेअर बाजारात निफ्टी (nifty) ३११ अंकांनी तर सेन्सेक्स १०४७ अंकांनी वधारला होता. यामध्ये मोठी भूमिका टाटा समूहाच्या शेअर टायटनने बजावली होती. हा शेअर भारतातील बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचा आवडता शेअर आहे. टायटनच्या शेअर ११८ रुपयांनी वाढला. २६५७ वरून २७२१ पर्यंत वर गेला आणि २७०६ वर बंद झाला.

झुनझुनवाला यांनी कमावले ५३४ कोटी
टायटन हा देशातील सर्वात मोठा ज्वेलरी ब्रँड आहे. कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार, राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे ४,५२,५०,९७० शेअर्स म्हणजेच डिसेंबर तिमाहीच्या अखेरीस कंपनीमध्ये ५.०९ टक्के हिस्सा आहे. झुनझुनवाला यांनी १७ मार्च रोजी टायटनमध्ये प्रति शेअर ११८ रुपयांच्या वाढीनुसार ५३४ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.

एका आठवड्यात दिला ९.३ टक्के परतावा
टायटनच्या शेअर्समध्ये अलीकडच्या काही दिवसांत मोठी उसळी दिसून आली आहे. गेल्या आठवड्यात या शेअरने ९.३ टक्के परतावा दिला आहे. गेल्या ६ महिन्यांत टायटनने बाजारातील अस्थिरतेतही गुंतवणूकदारांना ३० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तेव्हापासून समभागाने गुंतवणूकदारांना ३० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.(nifty)

nifty

एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये लहान आणि मोठ्या कंपन्यांसह ३७ कंपन्यांचा समावेश आहे आणि त्यांचा एकूण पोर्टफोलिओ ३२,४४२ कोटी रुपये आहे. डिसेंबर २०२१ च्या तिमाही डेटानुसार, राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील टॉप ५ कंपन्या एस्कॉर्ट्स लिमिटेड, टायटन कंपनी लिमिटेड, टाटा मोटर्स लिमिटेड, इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड, क्रिसिल लिमिटेड आहेत. अलीकडेच सूचीबद्ध मेट्रो ब्रँड आणि स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लि.मध्ये त्यांच्याकडे १४.४३ आणि १७.५१ टक्के हिस्सा आहे.

हेही वाचा :


राज्यासाठी पुढील १२ तास धोक्याचे..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *