100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा शेअर देईल 70 % परतावा

शेअर बाजारात (stock market)सध्या प्रचंड अस्थिरता आहे. अशा वेळी गुंतवणुकदारांना पैसे गुंतवण्याची चांगली संधी आहे. चांगले शेअर्स आताच पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करुन घेतले तर येत्या काळात चांगला फायदा मिळू शकतो. अशात मार्च 2022 च्या तिमाही निकालानंतर, ICICI सिक्युरिटीजने इक्विटास स्मॉल फायनांस बँकच्या (Equitas Small Finance Bank Ltd) स्टॉकवर खरेदी सल्ला दिला आहे. 100 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या या स्टॉकवर 92 रुपये प्रति शेअरचे टारगेट दिले आहे. FY23E पर्यंत RoA 2 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. AUM वाढ 30 टक्के अपेक्षित आहे.
70 टक्के परतावा मिळण्याची शक्यता
चौथ्या तिमाहीच्या निकालानंतर, ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेवर खरेदीचा सल्ला (Buy Rating) कायम ठेवला आहे. कंपनीने प्रति शेअर(stock market) टारगेट 92 रुपये केले आहे. 6 मे रोजी या शेअरची किंमत 54 रुपये होती. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांना सध्याच्या किमतीपेक्षा सुमारे 70 टक्के परतावा मिळू शकतो.
हा शेअर जानेवारी 2022 पासून हललेला नाही. यामध्ये गुंतवणूकदारांना 9 टक्क्यांहून अधिक नेगिटीव्ह रिटर्न मिळाला आहे. 9 मे रोजी, स्टॉकमध्ये घसरणीसह 53.55 वर व्यापार सुरू झाला. स्टॉकचा PE 24.26 वर आहे.
जानेवारी-मार्च 2022 च्या तिमाहीत बँकेची कमाई तिमाही आधारावर 11 टक्क्यांनी वाढून 120 कोटी रुपये झाल्याचे ICICI सिक्युरिटीजचे म्हणणे आहे. ग्रॅच्युइटी आणि रजा वेतनाबाबतच्या तरतुदी मागे घेतल्याने सुमारे 30 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मिळाले आहे. बँकेचे CASA प्रमाण 50 टक्क्यांच्या पुढे गेले आहे आणि Q4FY21 मध्ये रिटेल TD शेअर 55 टक्क्यांवरून 78 टक्क्यांपर्यंत वाढलाय.
डिजिटल उपक्रमांमुळे कंपनीला फायदा झाला आहे. मार्च 2022 मधील डिस्बर्समेंट रन रेट आणि चांगल्या ऍसेट क्वालिटी आउटलुक पाहता ब्रोकरेजला FY23 मध्ये वार्षिक 30 टक्के AUM वाढ अपेक्षित आहे. आर्थिक वर्ष 24 पर्यंत RoE14 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
चौथ्या तिमाहीचे निकाल
इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचा निव्वळ नफा जानेवारी-मार्च 2022 तिमाहीत 6 टक्क्यांनी (YoY) वाढून 130 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. बँकेने 26 कोटी रुपयांच्या स्टँडर्ड एसेट्स प्रोव्हिजनची तरतूद केली आहे. एकूणच, बँकेची तरतूद 123 कोटी रुपये आहे जी गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत 97 कोटी रुपये होती. बँकेचे नेट इंटरेस्ट मार्जिन 9.12 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. त्याच वेळी, नेट इंटरेस्ट इन्कम 23 टक्क्यांनी (YoY) वाढून 552 कोटी झाले जे एका वर्षापूर्वीच्या याच तिमाहीत 449 कोटी होते.
हेही वाचा :