सेन्केक्स 1000 पेक्षा अधिक अंकांनी वधारला;

Stock Market

परदेशातून मिळालेल्या माहितीनुसार आज देशांतर्गमधील शेअर मार्केटमध्ये  (Stock Market Today)  तेजी दिसून आली. आजच्या दिवशी प्रमुख सेन्सेक्स आणि निफ्टसह  (Stock Market Today) 2 टक्क्यांनी वाढून बंद झाले. आजच्या शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्स 1039.80 वाढून 56,816.65 वर बंद झाला. तर दुसरीकडे, निफ्टी 312 अंकांच्या वाढीसह 16975 च्या पातळीवर बंद झाला. रशिया युक्रेन युद्धामुळे (War) कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने शेअर मार्केटमध्ये आजची ही वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे आता शेअर मार्केटच्या नजरा फेडरल रिझर्व्हच्या बैठकीच्या निकालाकडे लागून राहिल्या आहेत.

शेअर मार्केट वाढला

परदेशातून मिळालेल्या सकारात्मकतेमुळे शेअर मार्केटमधील आजची वाढ दिसून आली. आशियाई शेअर मार्केटमध्ये आज तेजी होती, तर चीन आणि हाँगकाँगच्या बाजारात शेअर्सची जोरदार खरेदीही झाली. तर जपान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियातील शेअर मार्केटमधील प्रमुख निर्देशांक वाढून बंद झाले. आजच्या दिवशी अमेरिकन बाजारातही वाढ दिसून आली तर कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्यामुळे गुंतवणूकदार शेअर मार्केटवर लक्ष ठेऊन आहेत. रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष आता संपुष्टात येईल या आशेवर गुंतवणूकदारांनीही खरेदी केली आहे.

आजचा दिवस असा होता

आज दिवसभरात शेअर मार्केटमध्ये वाढीचाच निर्देशांक दिसून आला. त्यामुळे प्रमुश निर्देशांक चांगल्या प्रकारे वाढून बंद झाले. आजच्या शेअर मार्केटमध्ये BSE वर 2306 वाढ होऊन बंद झाला आहे. तर त्याच वेळी, 1128 वर घसरण होऊन 100 स्टॉकमध्ये कोणताही बदल नाही. आज 112 स्टॉकनी या वर्षातील उच्चांक गाठला. या वर्षातील 23 स्टॉक अगदी निच्चांकी पातळीवर राहिला आहे. आजच्या दिवसभराच्या व्यवहारादरम्यान 343 स्टॉकमध्ये अपर सर्किट, तर 228 समभागांनी लोअर सर्किटवर असल्याचे आढळून आले. आज BSE वर सर्व कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 256.23 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

कुठे कमाई कुठे तोटा

शेअर मार्केटच्या आजच्या बाजारात सर्वांगीण वाढ झाली असून सर्व क्षेत्र निर्देशांक हिरव्या चिन्हांपर्यंत येऊेन बंद झाले आहेत. तर रिअॅल्टी क्षेत्रात सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. सेक्टर इंडेक्समध्ये 3.64 टक्क्यांच्या वाढ होऊन बंद झाला. तर दुसरीकडे, तेल आणि वायू, ग्राहकोपयोगी वस्तू, खासगी बँका, धातू क्षेत्र, वाहन क्षेत्रामध्ये 2 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्याच वेळी, वित्तीय सेवा क्षेत्र, आयटी, एफएमसीजी, क्षेत्र निर्देशांक सुमारे 2 टक्क्यांच्या वाढ होऊन बंद झाला.

सेन्सेक्समधील केवळ 2 समभाग वगळता इतर सर्व समभाग वाढीसह बंद झाले. अल्ट्राटेक सिमेंट 4.69 टक्के, अॅक्सिस बँक 3.65 टक्के, इंडसइंड बँक 3.6 टक्के वाढीसह बंद झाले. दुसरीकडे, सन फार्मा आणि पॉवरग्रीडमध्ये मर्यादित घसरण दिसून आली.

 

Smart News:-

Rajasthan Royals च्या खेळाडूवर अश्विन इफेक्ट….!


रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी…


Share Market मधील आर्थिक नुकसानामुळे दोघांची आत्महत्या


राज्य सरकारचा ‘द कश्मीर फाइल्स’ करमुक्त करण्यास नकार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *