या कारणाने शेअर बाजारात घसरण!

परकी गुंतवणूकदारांनी (एफपीआय) मे महिन्यात आतापर्यंत ३५ हजार कोटी रुपये काढून घेतले आहेत. (stock market today) अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने केलेली दरवाढ आणि डॉलरची वाढलेली किंमत यांमुळे परकी गुंतवणूकदारांनी बाजारातून गुंतवणूक काढून घ्यायला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे २०२२मध्ये आतापर्यंत १.६३ लाख कोटी रुपये बाजारातून बाहेर गेले आहेत.

क्रूड तेलाच्या वाढलेल्या किमती, वाढती महागाई, देशांची अत्यंत कडक आर्थिक धोरणे यांमुळे परकी गुंतवणूकदारांचा बाजारातील गुंतवणुकीकडे ओढा कमीच राहणार असल्याचा अंदाज ‘कोटक सिक्युरिटीज’चे श्रीकांत चौहान यांनी सांगितले. ‘जीओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस’चे व्ही. के. विजयकुमार यांनीही चिंता व्यक्त करताना मजबूत होत जाणारा डॉलर आणि अमेरिकेतील बाजारातील स्थिती यांमुळे परकी गुंतवणूकदार गुंतवणूक काढून घेण्यालाच प्राधान्य देतील, असे म्हटले आहे.(stock market today)

एप्रिल महिन्यापर्यंतच्या गेल्या सात महिन्यांत परकी गुंतवणूकदारांनी बाजारातून १.६५ लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ७७०७ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली; मात्र नंतर लगेच गुंतवणूकदारांनी विक्रीला प्राधान्य दिले. मे महिन्यात आतापर्यंत परकी गुंतवणूकदारांचा बाजाराकडे ओघ कमीच राहिला आहे. २ मे २० मे या कालावधीत ३५,१३७ कोटी रुपये काढून घेतले आहेत. मजबूत होत जाणारा रुपया, हे यामागील प्रमुख कारण असल्याचे विजयकुमार यांनी सांगितले. अमेरिकेत ‘फेडरल रिझर्व्ह’ आणखी दरवाढ करण्याची शक्यता असल्याने परकी गुंतवणूकदारांची चिंता वाढल्याचे ‘मॉर्निंगस्टार इंडिया’चे हिमांशू श्रीवास्तव यांनी सांगितले.

हेही वाचा :


कोल्हापूर: पुढील चार दिवस पावसाचे ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *