शेअर बाजारात ‘या’ स्टॉक्समुळे गुंतवणूकदारांची बंपर कमाई

सर्वाधिक परतावा देणार्या टॉप 5 बद्दल बोलायचे तर कमाल परतावा 52 टक्के आहे, तर किमान परतावा 33 टक्के आहे. जास्त परतावा देणारे दोन स्टॉक (stock market) साखर उद्योगाचे आहेत. ज्यांनी गेल्या आठवड्यात सर्वाधिक परतावा दिला आणि गुंतवणूकदारांना मालामाल केले ते म्हणजे ओरॅकल क्रेडिट लि., चोठानी फूड्स लि., टेक सोल्युशन्स लि., द्वारिकेश शुगर इंडस्ट्रीज लि. आणि उगार शुगर वर्क्स लि. आहेत.
ओरॅकल क्रेडिट लिमिटेडच्या स्टॉकने गेल्या आठवड्यात 52.17 टक्के इतका चांगला परतावा दिला आहे. हा शेअर गेल्या आठवड्यात 41.4 रुपयांवर बंद झाला, तर काल संपलेल्या आठवड्यात तो 63 रुपयांवर बंद झाला. जर कोणी गेल्या आठवड्यात BSC वर ट्रेड केलेल्या या स्टॉकमध्ये 1,00,000 ची गुंतवणूक केली असेल, तर या आठवड्याच्या अखेरीस ते 1,52,000 रुपये झाले असते.
जास्त परतावा देणाऱ्यांमध्ये चोठानी फूड्स लिमिटेडचा शेअर दुसऱ्या क्रमांकावर होता. एका आठवड्यात 40.47 टक्के परतावा या शेअर दिला. गेल्या आठवड्यात चोठानी फूड्स लिमिटेडचा शेअर 11.39 रुपयांवर बंद झाला, तर या आठवड्यात 16 रुपयांवर बंद झाला. जर एखाद्याने गेल्या आठवड्यात या स्टॉकमध्ये 1,00,000 रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर आतापर्यंत ते 1,40,000 रुपये झाले असते.
टेक सोल्युशन्स लि (Take Solutions Ltd)
टेक सोल्युशन्स लिमिटेडच्या शेअरने या आठवड्यात 38.46 टक्के परतावा दिला आहे. गेल्या आठवड्यात या शेअरने 27.3 रुपयांवर क्लोजिंग दिली होते, तर या आठवड्यात 37.8 रुपयांवर बंद झाला आहे.
द्वारिकेश शुगर इंडस्ट्रीज लि (Dwarikesh Sugar Industries Ltd)
द्वारिकेश शुगरने 11 मार्च 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात 36.02 टक्के परतावा दिला आहे. गेल्या आठवड्यात या स्टॉकचा क्लोजिंग 94.95 वर झाला होता, तर या आठवड्यात या स्टॉकने 129.15 रुपयांवर झेप घेतली आहे. जर कोणी या स्टॉकमध्ये 1,00,000 रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर ती आतापर्यंत 1,36,000 रुपये झाली असेल.
उगर शुगर वर्क्स लि (Ugar Sugar Works Ltd)
उगर शुगरचा स्टॉक या आठवड्यात 64.05 रुपयांवर बंद झाला आहे, तर गेल्या आठवड्यात हा स्टॉक (stock market) 47.95 रुपयांवर बंद झाला होता. दोन्ही आठवड्यांच्या किमतीत 33.58 टक्के फरक आहे. त्यानुसार, जर कोणी या स्टॉकमध्ये 1,00,000 रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर आतापर्यंत ती गुंतवणूक 1,33,000 रुयये झाली असेल.
हेही वाचा :