stock market: शेअर बाजारात मोठी घसरण

stock market

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात(stock market) सुरु असलेले पडझडीचं सत्र आजही सुरुच राहिले. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकात घसरणीची नोंद झाली. सेन्सेक्स (Sensex) 439.51 अंकांची घसरण होऊन 56,757.64वर सुरु झाला तर निफ्टीमध्येही (Nifty) 162.95 अंकांची घसरण होऊन 17,009.05वर सुरु झाला.

तत्पूर्वी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे शुक्रवारी शेअर बाजार(stock market) जवळपास 2 टक्क्यांनी घसरला. सेन्सेक्स 1,141.78 अंकांनी अर्थात 1.95 टक्क्यांनी घसरून 57,197.15 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 303.65 अंकांच्या म्हणजेच 1.73 टक्क्यांच्या घसरणीसह 17,172 वर बंद झाला.

मे मध्ये यूएस फेडरल रिझर्व्हने दर वाढवल्यानंतर, बॉन्ड यील्ड वाढ, मिश्र तिमाही निकाल आणि रशिया-युक्रेनमधील परिस्थती आणखी बिघडल्याने शेअर बाजार लाल रंगात बंद झाला.

stock market

सेक्टरल इंडेक्सवर नजर टाकली तर लक्षात येईल की निफ्टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 5.6 टक्के आणि निफ्टी मीडिया इंडेक्स 4 टक्क्यांनी घसरला. निफ्टी पीएसयू बँक आणि निफ्टी बँक इंडेक्स प्रत्येकी 4 टक्क्यांनी घसरले. निफ्टी ऑटो इंडेक्स 3 टक्क्यांनी, निफ्टी एनर्जी आणि ऑइल अँड गॅस 2.4 टक्क्यांनी वाढले.

बीएसई मिडकॅप इंडेक्स 1.1 टक्क्यांनी घसरला, स्मॉलकॅप इंडेक्स 0.9 टक्क्यांनी घसरला आणि लार्जकॅप इंडेक्समध्ये 1.7 टक्क्यांची सर्वात मोठी घसरण झाली.

हेही वाचा:


खाद्यतेलाच्या दरात विक्रमी ‘वाढ’


IPL 2022: ‘इशान किशन पैशांमुळे बॅटींग विसरला’, मुंबईच्या माजी कॅप्टनचा गंभीर आरोप


सकाळी रिकाम्या पोटी अभिनेत्री पोटी चहा-कॉफी नाही, तर घेतात ‘हे’ ड्रिंक्स


इचलकरंजी: गावभागातील पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *