गुंतवणुकदारांना मालामाल करणारा हा शेअर तुमच्याकडेही आहे का ?

टाटा समूहाची (Tata Group) कंपनी Tata Elxsi च्या शेअरमध्ये गेल्या दोन दिवसांत 20 टक्क्यांनी जोरदार वाढ झाली आहे. यामुळे सोमवारी कंपनीच्या शेअरच्या किमतीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला. 2022 च्या सुरुवातीपासून कंपनीच्या स्टॉकमध्ये 52.19 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा मल्टीबॅगर स्टॉक गेल्या एका वर्षात 235 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. आतापर्यंत, याने गुंतवणूकदारांना 25,642 टक्यांचा जबरदस्त परतावा दिला आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांनी यातून भरपूर पैसा कमावला आहे.

शेअर प्राईज ऑल टाईम हायवर

सोमवारी व्यवहारादरम्यान,(tata group)कंपनीच्या शेअरची किंमत 7.55 टक्क्यांनी वाढून 9,078 रुपयांच्या नवीन उच्चांकावर पोहोचली. हा शेअरचा ऑल टाईम हाय आहे. नंतर तो 6.78 टक्क्यांनी वाढून 9,010 रुपयांवर बंद झाला. एमएससीआयने टाटा समूहाची ही कंपनी आपल्या बेंचमार्क इंडेक्समध्ये समाविष्ट करण्याचे म्हटले आहे. तेव्हापासून ही तेजी Tata Elxsi मध्ये नोंदवली जात आहे. एडलवाईस अल्टरनेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्चने त्यांच्या अहवालात म्हटले आहे की Tata Elxsi, जिंदाल स्टील अँड पॉवर, व्होल्टास, वरुण बेव्हरेजेस आणि अॅस्ट्रल यांचा एमएससीआय मानक निर्देशांकात समावेश केला जाऊ शकतो.

तज्ञांचा अंदाज काय आहे?

30 मार्च 2021 रोजी, टाटा अलेक्सीचा शेअर NSE वर 2,688.60 रुपये प्रति शेअर होता. तो आता 9,010 रुपयांवर पोहोचला आहे. 2022 मध्ये Tata Elxsi चा शेअर 52.88 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या एका महिन्यात त्याची वाढ 37.25 टक्क्यांनी झाली आहे. 1999 मध्ये टाटा समूहाच्या या कंपनीच्या शेअरची किंमत 35 रुपये होती. 2014 मध्ये पहिल्यांदाच त्याची किंमत 300 रुपयांच्या पुढे गेली. यात आणखी गती येण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.

हेही वाचा :


मुश्रीफ यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा खरपूस समाचार! पहा video..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *