‘हा’ शेअर सुसाट; कमी कालावधीत दिला दमदार परतावा..!

टाटा समूहाच्या एका कंपनीने जबरदस्त परतावा दिला आहे. ही कंपनी दुसरी-तिसरी नसून टाटा पॉवर (tata power) आहे. टाटा पॉवरच्या शेअर्सनी गेल्या २ वर्षातच जबरदस्त परतावा दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स २९ रुपयांवरून २३० रुपयांवर पोहोचले आहेत. टाटा पॉवरच्या शेअर्सने गेल्या २ वर्षांत जवळपास ८ पट परतावा दिला आहे.
२ वर्षात १ लाख रुपयाचे झाले ८ लाख
८ मे २०२० रोजी मुंबई शेअर बाजारात टाटा पॉवरचे (tata power) शेअर्स २८.२५ रुपयांच्या पातळीवर होते. १७ मार्च २०२२ रोजी कंपनीचे शेअर्स २३२.१० रुपयांच्या पातळीवर आहेत. कंपनीच्या समभागांनी २ वर्षांपेक्षा कमी कालावधीत जोरदार परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने ८ मे २०२० रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे ८.१४ लाख रुपये झाले असते. म्हणजेच ज्या गुंतवणूकदाराने पैसे गुंतवले असतील, त्याला २ वर्षांपेक्षा कमी कालावधीत ७ लाख रुपयांचा नफा झाला असेल.
शेअर्सनी दिला २ हजार टक्केपेक्षा जास्त परतावा
४ ऑक्टोबर २००२ रोजी टाटा पॉवरचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर ९.१९ रुपयांच्या पातळीवर होते. बुधवारी (१६ मार्च) टाटा पॉवरचे शेअर्स बीएसईवर २३०.२० रुपयांच्या पातळीवर आहेत. या कालावधीत कंपनीच्या समभागांनी गुंतवणूकदारांना दोन हजार टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने ४ ऑक्टोबर २००२ रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे २५.०४ लाख रुपयांच्या जवळपास गेले असते. म्हणजेच गुंतवणुकीवर २४ लाख रुपयांचा थेट नफा झाला असता. टाटा पॉवरचे मार्केट कॅप सुमारे ७३,५८० कोटी रुपये आहे.
हेही वाचा :