‘टाटा’ची ‘पॉवर’बाज कामगिरी! 29 रुपयांचा शेअर गेला 230 रुपयांवर

share price

टाटा ग्रुपच्या (Tata Group) अंतर्गत आताच्या घडीला शेकडो कंपन्या कार्यरत आहे. यातील अनेक कंपन्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड (Tata Power Company Stock) आहेत. केवळ भारतीय बाजारपेठेत (Indian Market) नाही, तर शेअर बाजारातही (Stock Market) दमदार कामगिरी करताना पहायला मिळत आहे. टाटा समूहातील एका कंपनीने कमाल कामगिरी केली आहे. केवळ 2 वर्षात या कंपनीने गुंतवणूकदारांना तब्बल 8 पटीने रिटर्न (share price) दिल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

टाटा समूहातील TATA Power या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. टाटा पॉवरच्या शेअर्सनी (share price) गेल्या दोन वर्षातच जबरदस्त परतावा दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 29 रुपयांवरुन 230 रुपयांवर पोहोचले आहेत. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मागील दोन वर्षात जवळपास 8 पटीने परतावा दिल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई शेअर बाजारात (Mumbai Stock Exchange) टाटा पॉवरचे शेअर्श 8 मे 2020 रोजी 28.25 रुपयांच्या पातळीवर होता.
हा शेअर 17 मार्च 2022 रोजी 232.10 रुपयांच्या पातळीवर आहे.एखाद्या व्यक्तीने 8 मे 2020 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आताच्या घडीला हे पैसे 8.14 लाख रुपये झाले असते. म्हणजे गुंतवणूकदारांना 2 वर्षात 7 लाख रुपयांचा फायदा झाला असता.

जर एखाद्या 4 ऑक्टोबर 2002 रोजी कंपनीमध्ये 1 लाख गुंतवले असते आणि ती गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आता हे पैसे 25.4 लाख रुपयांच्या जवळपास गेले असते. म्हणजे गुंतवणुकीवर 24 लाख रुपयांचा थेट फायदा झाला असता.विशेष म्हणजे टाटा पॉवरचे मार्केट सुमारे 73 हजार 580 कोटी रुपये आहे.


हेही वाचा :


किरीट सोमय्यांच्या ट्विटने खळबळ…


कोल्हापूर महाविकास आघाडी -भाजपमध्ये थेट लढत


तुम्ही घरी किती सोने ठेवू शकता?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *