हे पेनी स्टॉक आज अप्पर सर्किटमध्ये झेपावले..!

प्रमुख निर्देशांकांनी गुरुवारच्या सकाळच्या व्यवहार सत्रात मोठ्या नुकसानासह सुरुवात केली. त्यानंतर लगेचच त्यात सुधारणा आली. (bse sensex) बीएसई स्थावर मालमत्ता आणि आषधनिर्माण समभागांमध्ये खरेदी दिसून आली तर माहिती तंत्रज्ञान, बँक आणि वित्तीय समभाग विक्रीच्या दबावाखाली आले.
बीएसई सेन्सेक्स (bse sensex) तिसऱ्या दिवशी घसरणीसह सुरू झाला. ४१३ अंकांनी घसरत तो ५९,१९६.८४ वर आहे. एनटीपीसी, डॉ. रेड्डी लॅबोरेटरीज, अॅक्सिस बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, इंडसइंड बँक आणि आयसीआयसीआय बँक हे सेन्सेक्समध्ये सर्वाधिक वाढणारे शेअर आहेत. टायटन, एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, विप्रो आणि लार्सन अँड टुब्रो हे शेअर घसरणीसह व्यवहार करत आहेत. बीएसई मिडकॅप १२० अंकांनी वाढला आहे आणि २५,२९६.०० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक ९० अंकांनी वाढून २९,७८६.४८ वर व्यवहार करत आहे.
निफ्टी५० निर्देशांक ८९ अंकांनी घसरला असून तो १७,७१८.२० अंकांवर व्यवहार करत आहे. बँक निफ्टी १०० अंकांने घसरत ३७,५३१.९५ च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टी५० इंडेक्समध्ये सिप्ला, एनटीपीसी, अदानी पोर्ट्स, डॉ रेड्डी लॅबोरेटरीज आणि डिव्हिज लेबोरेटरी हे शेअर तेजीच्या सत्रात व्यवहार करतात. एचडीएफसी, एचडीएफसी बँक, टायटन, यूपीएल आणि विप्रो हे शेअर घसरणीसह व्यवहार करत आहेत.
गुरुवारी अप्पर सर्किटमध्ये पोहोचलेल्या काही पेनी स्टॉकची यादी पुढीलप्रमाणे आहे. आगामी सत्रांसाठी या समभागांवर गुंतवणूकदारांनी नजर ठेवायला हवी –
शेअर | सद्य भाव (रु) | किंमत वाढ (%) | |
कौशल्या | ४.७४ | ९.९८ | |
एक्सेल | ८.२९ | ९.९५ | |
बॅग फिल्म्स | ७.३ | ९.९४ | |
सुमीत इंड. | ९.९६ | ९.९३ | |
सेतू इन्फ्रा | २.९९ | ९.९३ |
हेही वाचा :