शेअर बाजार 700 अंकांनी उसळला, मार्केटला Reliance चा बूस्टर!

Share market

आज (मंगळवार) आयटी निर्देशांकात दोन टक्के आणि ऑटो निर्देशांकात 1.20 टक्क्यांची तेजी नोंदविली गेली. सेन्सेक्सचे टॉप-30 मधील 25 शेअर्स तेजीसह आणि पाच शेअर घसरणीसह बंद झाले. रिलायन्स (Reliance Share Price) आणि आयटी स्टॉक मध्ये निर्माण झालेल्या तेजीमुळे आज (मंगळवार) शेअर बाजारात (Share market) पुन्हा रिकव्हरी दिसून आली.

सेन्सेक्समध्ये 700 अंकांची तेजी नोंदविली गेली. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स 697 अंकांच्या तेजीसह (Sensex today) 57989 स्तरावर पोहोचला आणि निफ्टी 198 अंकांच्या तेजीसह 17315 च्या स्तरावर पोहोचला. आज (मंगळवार) आयटी निर्देशांकात दोन टक्के आणि ऑटो निर्देशांकात 1.20 टक्क्यांची तेजी नोंदविली गेली.

सेन्सेक्सचे टॉप-30 मधील 25 शेअर्स तेजीसह आणि पाच शेअर घसरणीसह बंद झाले. महिंद्रा, रिलायन्स आणि बजाज फायनान्शियल्स सर्व्हिसेस मध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. आणि हिंदुस्तान यूनिलिव्हर, नेस्ले इंडिया आणि सनफार्मामध्ये सर्वाधिक घसरण नोंदविली गेली.

मार्केट कॅप अप:

आजच्या तेजीनंतर BSE सूचीबद्ध (लिस्टेड) कंपन्यांचा मार्केट कॅपमध्ये वाढ झाली आहे. मार्केट कॅप 260.35 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ऑटो निर्देशांकात भारत फोर्ज आणि टाटा मोटर्स मध्ये 3 टक्क्यांहून अधिक तेजी नोंदविली गेली. दरम्यान, टाटा मोटर्सने 1 एप्रिल नंतर व्यावसायिक वाहनांच्या किंमती मध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे.

कच्च्या तेलाचा भडका:

कालच्या (सोमवार) घसरणीनंतर बाजाराच्या सुरुवातीला गुंतवणुकदारांनी सावधगिरीचा पवित्रा धारण केला होता.कच्च्या तेलाच्या किंमतीचा उडालेला भडका आणि अमेरिकेच्या दहा वर्षांच्या बाँड यील्ड मध्ये झालेली वाढ यामुळे शेअर बाजारावर (Share market) दबाव दिसून आला. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी वाढत्या महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. आगामी मे महिन्यात होणाऱ्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत व्याज दरांत 0.50 टक्क्य्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

आजचे वधारणीचे शेअर्स 

• टेक महिंद्रा (3.95%)
• बीपीसीएल (3.14%)
• टाटा मोटर्स (2.90%)
• रिलायन्स (2.58%)
• आयओसी (2.25%)

आजचे घसरणीचे शेअर्स 

• एचयूएल (-2.81%)
• नेस्ले (-2.50%)
• ब्रिटानिया (-2.44%)
• सिप्ला (-1.69%)
• डिव्हिज् लॅब्स (-0.17%)

 

Smart News:-

मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर ED ची कारवाई, ठाण्यातील कोटींचे ११ फ्लॅट्स जप्त


IPL 2022 – बुमराहपेक्षाही धोकादायक आहेत हे 5 बॉलर…


हॉलिवूडलाही पछाडलं The Kashmir Files ने


व्यापाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *