investors: पेनी स्टॉककडून अप्पर सर्किटचा टप्पा पार

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह या मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या पतधोरणविषयक आक्रमक विधानांमुळे भांडवली बाजारातील गुंतवणूकदार(investors) सावध आहेत. यामुळे निर्माण झालेले जागतिक बाजारातील अस्थिरतेचे प्रतिबिंब नव्या आठवड्याला भारतीय बाजारातही उमटले. सोमवारी माहिती तंत्रज्ञान, जीवनापयोगी वस्तू आणि आषधनिर्माण क्षेत्रातील समभागांमध्ये लक्षणीय विक्री झाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक त्यांच्या वरच्या टप्प्यावरून माघारी फिरले.
बीएसई सेन्सेक्स शुक्रवारच्या तुलनेत ५१३ अंकांनी खाली येत ५६,६८३.३२ वर आहे. मुंबई निर्देशांकात आयसीआयसीआय बँक, मारुती सुझुकी, अॅक्सिस बँक आणि महिंद्रा अँड महिंद्रा सर्वाधिक लाभ मिळवणारे समभाग आहेत. तर टाटा स्टील, टेक महिंद्रा, विप्रो, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि एनटीपीसी यांचे शेअर घसरणीसह व्यवहार करत आहेत. बीएसई मिडकॅप ३६१ अंकांनी घसरत २४,३३६.९२ वर आहे. तर स्मॉलकॅप निर्देशांक ३७४ अंकांनी खाली येत २८,८७३.५२ वर आहे(investors).
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी५० निर्देशांक १६४ अंक नुकसानासह १७,००७.६५ वर व्यवहार करत आहे. याउलट बँक निफ्टी १०८ अंकांनी वाढून ३६,१५३.४५ वर आहे. निफ्टी५० निर्देशांकात आयसीआयसीआय बँक, बजाज ऑटो, अॅक्सिस बँक, आयशर मोटर्स आणि मारुती सुझुकी हे तेजीचे व्यवहार करणारे समभाग आहेत. तर बीपीसीएल, कोल इंडिया, टाटा स्टील, टेक महिंद्रा आणि ब्रिटानिया हे समभाग घसरणीच्या यादीत व्यवहार करत आहेत.
हेही वाचा: