सेन्सेक्स, निफ्टी तेजीत; हे पेनी स्टाॅक वेगात…

आशियाई बाजारांचा मागोवा घेताना सकाळच्या सत्रात प्रमुख भारतीय निर्देशांक वाढले. कच्च्या तेलाची वाढ आणि त्याचा देशांतर्गत किमतींवर तसेच अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. परकीय गुंतवणूकदारांनी गेल्या आठवडाअखेर २,२६३.९० कोटी काढून घेतले. देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी शेअर बाजारात (penny stock) रु. १,६८६.८५ कोटींचे शेअर खरेदी केले.
एस अँड पी बीएसई सेन्सेक्स सोमवारी सकाळी ३४३ अंक वाढीसह ५५,८९३.४० वर पोहोचला आहे. एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया हे सर्वाधिक वाढणारे समभाग आहेत. बीएसई मिडकॅप १४४ अंकांनी घसरला आहे आणि २३,१६५.६४ वर व्यवहार करताना दिसत आहे. बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक २४ अंकांनी वाढून २७,१६६.१२ वर तेजीसह व्यवहार करत आहे.
निफ्टी ५० निर्देशांकही ७२ अंकांनी वधारला असून तो १६,७०२.८५ अंकांवर व्यवहार करत आहे. बँक निफ्टी ३९९ अंकांनी वाढत ३४,९४५.५५ वर व्यवहार करत आहे. निफ्टी ५० इंडेक्समध्ये एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इन्फोसिस हे शेअर (penny stock) तेजीसह व्यवहार करत आहेत. तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, टाटा मोटर्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, बीपीसीएल आणि एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स या समभागांचा समावेश घसरणीच्या यादीत आहे.
हेही वाचा :