अशा प्रकारे स्वस्तात खरेदी करता येईल सोने !!!

gold

भारतीय लोकांमध्ये सोने(gold) हे खूपच लोकप्रिय आहे. तसेच सोन्याला नेहमीच गुंतवणुकीचे एक सुरक्षित साधन देखील मानले गेले आहे. यामध्ये गुंतवणूक केल्याने चांगला रिटर्न देखील मिळतो. यामुळे जर आपणही सोन्यामध्ये गुंतवणूकीचा विचार करत असाल तर हे जाणून घ्या कि, सरकार कडून सॉव्हरेन गोल्ड बाँड योजनेअंतर्गत लोकांना स्वस्तात सोने(gold) खरेदी करण्याची संधी दिली जात ​​आहे.

या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना फिजिकल गोल्ड मिळत नाही, मात्र सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याची संधी देते. 20 जून रोजी उघडलेल्या सॉव्हरेन गोल्ड बाँडचा इश्यू 24 जून रोजी बंद होईल. यामध्ये कोणत्याही व्यक्तीला एका आर्थिक वर्षात एक ग्रॅम ते चार किलोपर्यंतचे सोने(gold) खरेदी करता येते. हे लक्षात घ्या कि, याद्वारे गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 7.37 टक्के नफा मिळाला आहे. या आर्थिक वर्षातला हा पहिलाच इश्यू आहे तर दुसरा इश्यू हा ऑगस्टमध्ये येईल.

एका मीडिया रिपोर्टनुसार, या योजनेअंतर्गत आपल्याला किमान 1 ग्रॅम सोने खरेदी करावे लागेल. यासाठी सरकारकडून 5,041 रुपये प्रति ग्रॅम दर निश्चित केला गेला आहे. तसेच डिजिटल पेमेंटद्वारे खरेदीवर यामध्ये 50 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळेल. गेल्या एका वर्षातील रिटर्न बाबत बोलायचे झाले तर ते रुपयात 7.37 टक्के आणि डॉलरमध्ये 4.17 टक्के आहे.

याचा मॅच्युरिटी पिरियड 8 वर्षांचा आहे. मात्र यामधून गुंतवणूकदारांना 5 वर्षानंतरही पैसे काढता येतील. एका आर्थिक वर्षामध्ये एका व्यक्तीला जास्तीत जास्त 4 किलो सोने(gold) खरेदी करता येतील. याचा अर्थ असा की, जर एका वर्षात सॉव्हरेन गोल्ड बाँड्सचे अनेक इश्यू आले तर त्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला एकूण गुंतवणूक 4 किलोपेक्षा जास्त करता येणार नाही.

यावर दरवर्षी 2.5% व्याज दिले जाते. जर एखाद्याने मुदतीपर्यंत बॉण्ड्स होल्ड केले तर त्याला कोणत्याही प्रकारचा कॅपिटल गेन्स टॅक्स द्यावा लागत नाही.

बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SHCIL), क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, काही पोस्ट ऑफिस, NSE आणि BSE द्वारे गुंतवणूकदारांना सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड्स खरेदी करता येतील.

Smart News:-

“व्वा मुख्यमंत्री जी, तुमच्याबद्दलचा आदर आज अजून वाढला”; इम्तियाज जलील यांचे ट्वीट


बंडखोर आमदारांची पहिली पसंत ‘भाजप’, 5 वर्षांत तब्बल 182 जणांनी घेतलीय शरण


चित्रा वाघ यांचा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल


सोनिया गांधींनी ईडीसमोर हजर राहण्यासाठी मागितला वाढीव वेळ


विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास दीड लाख रुपयांचे अनुदान – शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड


 

Leave a Reply

Your email address will not be published.