जाणून घ्या आजचे टॉप 10 परफॉर्म करु शकणारे शेअर्स कोणते?

आरबीआयने व्याजदरात अचानक वाढ केल्यानंतर बुधवारी बाजारात सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. दरम्यान, यूएस फेडने व्याजदरात 0.50 टक्के वाढ जाहीर केल्यानंतर जागतिक बाजाराला काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. गुरुवारी सकाळच्या व्यवहारात आशियाई बाजारातही चांगली तेजी पाहायला मिळाली. पण, शेवटी जगभरातील सर्वच बाजारांचा नफा कमी होऊन सपाट बंद झाल्याचे दिसून आले.(top 10 performing stocks)

भारतीय बाजारही त्याला अपवाद नव्हता. सकाळी जोरदार सुरुवात झाल्यानंतर हळूहळू तो दबावाखाली येऊ लागला आणि दुपारच्या जेवणानंतरच्या ट्रेडिंग सत्रात बाजारावर नफावसुलीचे (Profit Booking) वर्चस्व राहिले. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 33.20 अंकांच्या अर्थात 0.06 टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह 55,702.23 वर बंद झाला. निफ्टी 5.05 अंकांच्या अर्थात 0.03 टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह 16,682.65 वर बंद झाला.(top 10 performing stocks)

आज कशी शेअर बाजाराची स्थिती?

रिऍल्टी, फार्मा आणि पीएसयू बँक शेअर्समध्ये नफावसुली (Profit Booking) झाल्यामुळे सुरुवातीचा नफा गमावल्यानंतर बाजार गुरुवारी सपाट बंद झाल्याचे कोटक सिक्युरिटीज लिमिटेडचे श्रीकांत चौहान म्हणाले. वाढत्या महागाईच्या चिंतेमुळे गुंतवणूकदार रिस्क घेत नसल्याचे दिसून आले. याशिवाय एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार सेकंडरी मार्केटमध्ये आपली पोझिशन हलकी करताना दिसतात. त्यामुळे बाजारावरही दबाव निर्माण झाला.

मोठ्या घसरणीनंतर, निफ्टीने इनसाइड बियरिश कँडल तयार केली आणि इंट्राडे चार्टवर लोअर टॉप बॉटम होल्ड केला आहे. जे सध्याच्या पातळीपासून आणखी कमजोरी दाखवत आहे. जोपर्यंत निफ्टी 16,850 च्या खाली राहील तोपर्यंत त्याची घसरण सुरूच राहील आणि निफ्टी 16,600-16,500 च्या खाली जाताना पाहू शकतो. वरच्या बाजूने, निफ्टीसाठी 16,800 आणि 16,850 स्तरांवर रझिस्टंस आहे. हा रझिस्टंस तुटला की, निफ्टी 16850- 16,950 च्या दिशेने जाऊ शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

टेक महिन्द्रा (TECHM)

हिरो मोटोकॉर्प (HEROMOTOCORP)

इन्फोसिस (INFOSYS)

एचसीएल टेक (HCLTEC)

टाटा स्टील (TATASTEEL)

इंडसइंड बँक (INDUSINDBANK)

ब्रिटानिया (BRITANNIA)

सनफार्मा (SUNPHARMA)

टाटा कंझ्युमर (TATACONSUM)

नेसले इंडिया (NESTLEIN)

हेही वाचा :


भाजपला मनसेची गरज नाही : आठवले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *