corporation: अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनच्या शेअरची आघाडी

corporation

इंधन शुध्दीकरण आणि पवनचक्की, वाहतूक आणि पेट्रोकेमिकल्स सारख्या क्षेत्रातील आघाडीची अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन(corporation) लिमिटेड ही मुख्यत्वे विविध बिटुमन आणि बल्क एलपीजी वाहतूक करणा-या व्यवसायातील कंपनी आहे.

अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन(corporation)लिमिटेडचा स्टॉक तेजीत आहे. सोमवारी सकाळच्या सत्रात ७१२.२५ रुपयांच्या गेल्या ५२ आठवड्यांच्या नव्या उच्चांकावर तो पोहोचला. त्यात एकाच सत्रात जवळपास ५% वाढ झाली आहे आणि सरासरीपेक्षा अधिक व्यवहार त्याने आज नोंदविले. ५२ महिन्यांच्या कप पॅटर्नमधून अनेक वर्षांचा ब्रेकआऊटही त्याने दिला आहे. तांत्रिक आलेखाबाबत, या स्टॉकने त्याच्या खुला=किमान स्थितीसह एक मजबूत तेजीची कँडल तयार केली आहे.

शेअरचे १४-कालावधी दैनिक RSI (६८.२०) मजबूत सामर्थ्य दर्शवत असून ते तेजीत आहे. शेअरचा ADX (२९.२३) कल निर्दशक तेजीचा कल दर्शवितो आणि वरच्या टप्प्याकडे संकेत देतो. दरम्यान, शेअरच्या MACD ने तेजीच्या क्रॉसओव्हरचे संकेत दिले आहेत. गेल्या दोन व्यवहार सत्रांमध्ये या समभागाने सरासरीपेक्षा अधिक वाढ नोंदवली आहे. खंड १०-दिवस, ३०-दिवस आणि ५०-दिवसांच्या सरासरी व्यवहार संख्येपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट होते. अशाप्रकारे गुंतवणूकदारांचे शेअरमधील मोठ्या संख्येतील खरेदीचे स्वारस्य दर्शविले जाते.

वार्षिक आधारावर या स्टॉकने ८०% पेक्षा अधिक मूल्यझेप घेतली आहे. असे करत शेअर मोठ्या फरकाने त्याच्या स्पर्धकांपुढे गेला आहे. विविध मुद्द्यांचा विचार करता शेअरमध्ये मजबूत तेजी असल्याचे स्पष्ट होते. आगामी काळात हा स्टॉक रु. ७९० च्या सार्वकालीन उच्च टप्पा गाठण्याची अपेक्षा आहे. गुंतवणूकदार या स्टॉकमधून अधिक परताव्याची अपेक्षा करू शकतात. कारण तांत्रिक विश्लेषणाने हे सिद्ध होते.

हेही वाचा:


ठाकरे सरकारला मिळाले ६०० कोटी…!


investors: पेनी स्टॉककडून अप्पर सर्किटचा टप्पा पार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *