टपाल विभागाच्या बँकेतूनही सर्व प्रकारची कर्ज नागरिकांसाठी उपलब्ध!

देशातील शासकीय, सहकारी आणि खासगी बँकांमधून घरबांधणी, दुरुस्ती त्याचबरोबर उद्योग आणि व्यवसायासाठी कर्ज काढावयाचे म्हटले तर गरजू नागरिकांना या बँकाचे अक्षरक्ष: उंबरठे झिजवावे लागतात. आवश्यक असलेली कागदपत्रे देऊनसुद्धा कर्ज मंजूर होईलच याची कोणीही खात्री देऊ शकत नाही. आता मात्र टपाल विभागाच्या (us postal office) बँकेमार्फत सर्व प्रकारची कर्ज नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत. कमीतकमी कागदपत्रांमध्ये कर्ज कसे मिळेल, यावर भर देण्यात येणार आहे.

देशासह राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना उद्योग, व्यवसाय, घर बांधणी, दुरुस्ती यासह विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणावर रकमेची गरज भासत असते. त्यासाठी सामान्य नागरिक शासकीयसह खासगी, (us postal office) सहकारी बँकांकडे अर्ज करीत असतो. संबंधित बँकांमध्ये कार्यरत असलेले अधिकारी, अव्वल कारकून किंवा सहकारी बँकांमधील संचालक मंडळ यांचा मनमानी कारभार, देण्यात येत असलेली अपमानास्पद वागणूक याबरोबरच बँकाच्या नियमानुसार कागदपत्रांची पूर्तता केली तरी त्यामध्ये त्रुटी काढून कर्ज कसे नामंजूर होईल, यावर या बँकांचा भर असतो.

त्यामुळे नागरिक अक्षरक्ष: वैतागून जातो आणि तो नाईलाजाने फायनान्स किंवा सावकारी कर्ज घेण्यास प्रवृत्त होतो. अशा प्रकारच्या कर्ज देणार्‍या संस्थांचे फावते. नागरिकांच्या गरजेचा फायदा या संस्था घेत असतात. त्या या संस्था मनमानी पद्धतीने व्याजदरांची आकारणी करत असल्याचे निदर्शास आले आहे.

बँकांची मनमानी लक्षात घेऊन टपाल विभागाच्या बँकेच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या कामांसाठी कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी कमीतकमी कागदपत्रे कशी लागतील, यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शहरीभागापेक्षा या बँकांचे लक्ष ग्रामीण भागावर असणार आहे, अशी माहिती टपाल विभागातील अधिकार्‍यांनी दिली.

हेही वाचा :


ईडी कोठडीतून संजय राऊतांचं विरोधी पक्षातील नेत्यांना पत्र

Leave a Reply

Your email address will not be published.