शेअर बाजाराचा मूड कसा असेल? या 10 शेअर्सवर आज करा फोकस!

गुरुवारी भारतीय बाजार (indian market) सलग तिसऱ्या दिवशी लाल चिन्हाने अर्थात घसरणीसह बंद झाला. फार्मा वगळता जवळपास सर्वच सेक्टर्समधील विक्रीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सुमारे 1 टक्क्यांची घसरण झाली आहे. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 575.46 अंकांनी म्हणजेच 0.97 टक्क्यांनी घसरून 59,034.95 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 168.10 अंकांनी किंवा 0.94 टक्क्यांनी घसरून 17640 च्या पातळीवर बंद झाला.

आरबीआयच्या धोरणाच्या एक दिवस आधी बाजारात अस्थिरता वाढत असल्याचे दिसून आल्याचे निओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. मेटल, पॉवरसह ऑईल अँड गॅससारख्या शेअर्सना जास्त फटका बसला आहे. मिड आणि स्मॉलकॅपलाही फटका बसला आहे. आरबीआयच्या घोषणा बाजाराची जी अपेक्षा आहे(म्हणजे, जर दर बदलले नाहीत आणि चलनवाढीचा अंदाज किरकोळ जास्त राहिला आणि मजबूत आर्थिक दृष्टीकोन असेल तर) तर बाजारामध्ये सकारात्मक कल दिसून येईल असेही ते म्हणाले. (indian market)

आज बाजाराची स्थिती कशी असेल?

येत्या ट्रेडिंग सत्रासाठी निफ्टी 17,550 आणि 17,400 वर सपोर्ट शोधत आहे आणि जोपर्यंत निफ्टी या पातळीच्या खाली जात नाही तोपर्यंत जेव्हाही घसरण असेल तेव्हा खरेदीचे धोरण कायम ठेवले पाहिजे असे एंजल वनच्या समीत चव्हाण यांनी सांगितले. वरच्या बाजूने, निफ्टीसाठी 17,800 आणि 17,900 वर रझिस्टंस दिसून येतो. निफ्टीने 17,900 ची पातळी ओलांडल्यानंतर त्यात आणखी वाढ होऊ शकते असेही ते म्हणाले.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

ॲक्सिस बँक (AXISBANK)

डिविस लॅबोरेटरी (DIVISLAB)

हिंदूस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)

आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)

डॉ.रेड्डी (DRREDDY)

भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड (BEL)

ए यू बँक (AUBANK)

ॲस्ट्रल (ASTRAL)

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRITRANSFIN)

अशोक लेलँड (ASHOKLEY)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

हेही वाचा :


श्री जोतिबा यात्रेतील भाविकांची गैरसोय नको

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *