आज कसा असेल शेअर बाजाराचा मूड?

सोमवारी म्हणजेच 18 एप्रिलला कमकुवत जागतिक संकेत, वाढती महागाई आणि HDFC-Infy च्या खराब परफॉर्मन्समुळे, बाजारात सलग चौथ्या दिवशी कमजोरी दिसून आली. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 2.01 टक्‍क्‍यांनी अर्थात 1,172.19 अंकांनी घसरून 57,166.74 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 302 अंकांच्या म्हणजेच 1.73 टक्क्यांच्या घसरणीसह 17,173.70 वर बंद झाला.(today’s top 10 shares)

सोमवारच्या व्यवहारात बाजारात गॅप-डाउन ओपनिंग होते असे एलकेपी सिक्युरिटीजचे एस. रंगनाथन म्हणाले. सोमवारी दिवसभर बाजारात कुठेही रिकव्हरी दिसून आली नाही. आयटी कंपन्यांचे कमकुवत निकाल आणि कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे महागाईचा दबाव शेअर बाजारावर दिसून आला.

निफ्टी आणि सेन्सेक्सचा तांत्रिकदृष्ट्या विचार केल्यास त्यांच्यात गॅप डाऊन डोजी कॅंडलस्टिक (gapping down Doji candlestick) तयार झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. हे बुल्स आणि बेअरमधील अनिश्चितता दर्शवते. मोठ्या घसरणीसह, निफ्टी 200 आणि 500 दिवस SMA च्या जवळ व्यवहार करत आहे. बाजाराचा कल मोठ्या प्रमाणात मंदीचा असल्याचेही ते म्हणाले.

निफ्टीने 17,200 आणि सेन्सेक्स 57,300 पातळी ओलांडल्यानंतरच नवीन पुलबॅक रॅली दिसू शकते. असे झाल्यास निफ्टी 17,300-17,375 आणि सेन्सेक्स 57,600-57,900 वर जाताना दिसेल. तर खाली, निफ्टीला 17,150 वर आणि सेन्सेक्सला 57,150 वर सपोर्ट दिसत आहे. जर हे सपोर्ट ब्रेक झाले तर निफ्टी 17,000-16,900 च्या दिशेने जाताना दिसेल. दुसरीकडे, सेन्सेक्स 57,000-56,700 च्या दिशेने जाताना दिसू शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ? (today’s top 10 shares)

एनटीपीसी लिमिटेड (NTPC)

एसबीआय लाईफ (SBILIFE)

एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)

टाटा स्टील (TATASTEEL)

मारुती (MARUTI)

भारत एलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL)

टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

पेज इंडिया (PAGEINDIA)

गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

टाटा पॉवर (TATAPOWER)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

हेही वाचा :


स्वदेशी मायक्रोमॅक्स लवकरच सादर करणार लो बजेट स्मार्टफोन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *