Paytm रिझर्व्ह बँकेच्या रडारवर

paytm

देशातील सर्वात मोठा आयपीओ, सर्वाधिक गतीने झेप घेणारी फिनटेक कंपनी, भारताच्या दमदार नव उद्योगांचा चेहरा, डिजिटल पेमेंट कंपनी अशा विविध प्रकारे (Paytm) कंपनीच्या आयपीओची जाहिरात करण्यात आली होती. मात्र आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (Reserve Bank Of india) शंका येण्या इतपत परिस्थितीत बिघडली आहे. आयपीओ बाजारात दाखल होत असताना पेटीएमचे कौतूक काही केल्या थांबत नव्हते. त्यामुळे पेटीएमबाबत साशंक असलेले गुंतवणूकदार ही आपसूकच या आयपीओकडे वळाले.

पण आता त्यांचा पैसा पाण्यात गेला आहे आणि त्यांना फसविल्याची जाणीव गुंतवणुकदारांना सलत आहे. 2150 रुपयांचा इश्यु प्राईस (Issue Price) असलेला पेटीएमचा इश्यु प्राईस 72 टक्क्यांनी घसरला आहे. त्याचे हे लोटांगण गुंतवणकुदारांसाठी चिंतेची बाब आहे. कारण त्यांच्या 100 रुपयांतील 72 रुपये बुडाले तर उर्वरीत 28 रुपये पण किती दिवस वाचतील याचा गुंतवणुकदारांना भरवसा राहिलेला नाही.

त्यावेळी येणारा प्रत्येक आयपीओ गुंतवणुकदारांनी डोक्यावर घेतला होता. त्यात प्रचंड गुंतवणूक झाली होती. परंतु, पेटीएमविषयी गुंतवणुकदारांच्या मनात साशंकता होती. पेटीएमचा आयपीओ दुप्पटीतही नोंद झाला नाही. मोठ्या वित्त संस्था या आयपीओपासून दोन हात दूर होत्या. परंतु, किरकोळ ग्राहकांनी, गुंतवणुकदारांनी पेटीएम निदान काही तरी नफा तर देईल या आशेने मोठी गुंतवणूक केली होती.

त्यामुळे पेटीएमचे (paytm) नशीब फळफळले. परंतु, शेअर बाजारात सूचीबद्ध होताच, पहिल्याच दिवशी पेटीएमचा आयपीओने 25 टक्क्यांच्याही खाली राहिला. हा शेअर 1586 रुपयांवर येऊन थांबला. ग्लोबल ब्रोकरेज कंपनी मैक्वायरी यांनी पेटीएमच्या व्यावसायिक पद्धती व नियोजनावर सडकून टिका केली. हे बिझनेस मॉडेल दिशाहीन असल्याचा आरोप केला. तसेच हा आयपीओ 1200 रुपयांपर्यंत खाली येईल असा अंदाज वर्तविला होता.

पहिल्याच दिवशी एक पावची हापकी खाललेल्या पेटीएमची भविष्यातील वाटचाल कशी असेल याचा अंदाज आलेल्या काही गुंतवणुकदारांनी नफा जाऊ द्या पण कमी फटका बसेल म्हणून काढता पाय घेतला, ते नशीबवान ठरले. कारण त्यांचे फार मोठे नुकसान झाले नाही. मात्र ज्या गुंतवणुकदारांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली. ते सपशेल बुडाले. कारण मंगळवारी पेटीएमचा शेअर 584 रुपयांवर घसरला.


हेही वाचा :


प्रियकराला भेटण्यासाठी विवाहित प्रेयसीने ओलांडली ‘सीमा’ पण….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *