फ्लॅट रंगविण्यासाठी आला अन् चुना लावून गेला, अभिनेत्रीच्या  घरी लाखोंची चोरी

८० आणि ९०च्या दशाकातील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये(actress) पूनम ढिल्लनची गणना केली जाते. अभिनेत्री पूनम ढिल्लन सध्या एका वेगळ्या बातमीमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री पूनम ढिल्लनच्या मुंबईतल्या खारमधील घरामध्ये चोरी झाली आहे.

अभिनेत्रीच्या(actress) घरातील लाखो रुपयांचं सामान चोरट्यांनी लंपास केलं आहे. चोरी करणाऱ्या चोरट्याला खार पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेत्रीच्या घरी चोरी २८ डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान झाली होती. घराचं रंग काम करण्यासाठी आलेल्या कारागिराने अभिनेत्रीच्या घरावर डल्ला मारला आहे.

अभिनेत्रीच्या घरावर डल्ला मारणाऱ्या चोरट्याचं नाव समीर अन्सारी असून तो ३७ वर्षीय आहे. चोरट्याने पूनम ढिल्लनच्या घरातून तब्बल एक लाख रुपये किंमतीचा हिऱ्याचा हार, काही अमेरिकन डॉलर्स आणि ३५ हजार रुपयांची रोख चोरल्याप्रकरणी खार पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.

अभिनेत्रीच्या घरी चोरी झाल्याचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी चोरट्याची कसून चौकशी केली. कसून चौकशी केल्यानंतर त्याला ६ जानेवारीला खार पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा :

प्रेमासाठी काय पण! भिकाऱ्याच्या प्रेमात बुडाली 6 मुलांची आई; पती आणि लेकरांना सोडून पळाली

शरद पवारांची राष्ट्रवादी फुटणार? तटकरेंची ऑफर काय.., आव्हाडांनी क्लिअरच केलं

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या भाविकांसाठी मोठी अपडेट, गाभाऱ्यातील प्राचीन शिळा..’