दहावी बारावी संदर्भात सीबीएसईकडून मोठी घोषणा..!

सीबीएसई बोर्डाच्या (CBSE) दहावी आणि बारावी परीक्षेच्या दुसऱ्या टर्मची तारीख नुकतीच जारी करण्यात आली आहे. जारी करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार (CBSE Class 10 and Class 12 exam Schedule) इयत्ता दहावीची दुसऱ्या सत्राची परीक्षा 05 मे पासून सुरु होईल. ती 24 मे रोजी समाप्त होईल, तर इयत्ता बारावीच्या दुसऱ्या टर्मची परीक्षा 26 एप्रिल पासून सुरु होईल आणि 19 मे रोजी समाप्त होईल. परीक्षेचं वेळापत्रक www.cbse.gov.in या अधिकृत वेसबाईटवर जाऊन डाऊनलोड करता येईल.

डेट शीट कशी पाहावी
स्टेप 1: सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट– cbse.nic.in ला भेट द्या .

स्टेप 2: त्यात Whats New याच्या लिंकवर क्लिक करा.

स्टेप 3: 10 वी किंवा 12 वीच्या लिंकवर क्लिक करा.

स्टेप 4: आता एक पीडीएफ उघडेल, ते डाऊनलोड करा.

परीक्षा सकाळी 10.30 वाजता सुरु
नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील थंडीचा विचार करता सीबीएसईकडून परिक्षा सुरु करण्याच्या वेळेत बदल करण्यात आला होता. यावेळी सकाळच्या सत्रातील परीक्षा 10.30 वाजता सुरु होतील. तर, विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचं वाचन करण्यासाठी 20 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे.

ऑफलाईन परीक्षा
सीबीएसई बोर्डाने म्हटले आहे की, सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षा केवळ ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील. बोर्डाने टर्म -1 परीक्षेतील पेपर 50 टक्के अभ्यासक्रमावर आधारित पेपर घेतले. आता यावेळी टर्म 2 ची परीक्षा उर्वरित 50 टक्के अभ्यासक्रमवार घेण्यात येईल.

प्रश्न कसे असणार?
सीबीएसईतर्फे घेण्यात येणारी टर्म दोन ची परीक्षा दीर्घोत्तरी प्रश्नांच्या स्वरुपात असेल. विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तर लिहावी लागणार आहेत.

हेही वाचा :


अजित पवारांच्या 60 मोठ्या घोषणा, वाचा एका क्लिक वर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *