‘युजीसी’चा मोठा निर्णय! विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी..!

बाहेरच्या देशात जावून शिक्षण (Education) घेण्याची अनेक विद्यार्थ्यांची इच्छा असते. आता या विद्यार्थ्यांसाठी (Student) एक चांगली बातमी समोर आली आहे. आता त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेरच्या देशात जावून राहण्याची गरज नाही. (ugc) आता असे विद्यार्थी देशातच राहून जगातील नावाजलेल्या विद्यापीठात शिक्षण घेऊ शकतात. यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. या अंतर्गत देशातील कोणत्याही विद्यापीठ जगातील कोणत्याही सर्वोच्च विद्यापीठासोबत (University) सामायिक अभ्यासक्रम सुरू करू शकते.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) पुढील शैक्षणिक सत्रापासून (२०२२-२३) भारतीय आणि विदेशातील संस्थांना संयुक्त पदवी, दुहेरी पदवी प्रोग्रॅम आणि ट्विन प्रोग्रॅम साठी परवानगी दिली आहे. यूजीसीचे अध्यक्ष प्रा. एम जगदेश कुमार यांनी मंगळवारी भारतीय आणि विदेशी संस्थांचे एकत्रित पदवी प्रोग्रॅम सुरू करण्याची घोषणा केली. या संदर्भात या आठवड्यात अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.(ugc)
भारत सरकारने जाहीर केलेल्या एनआयआरएफ (NIRF) रँकिंगमधील टॉप १०० आणि जागतिक रॅकिंगमध्ये असलेल्या १००० जागतिक संस्थांचा या पदवी प्रोग्रॅममध्ये सहभाग असू शकतो.
यूजीसीने (UGC) सांगीतले की, संयुक्त पदवी प्रोग्रॅमचे नियम बनवण्यापूर्वी नागरिकांचे अभिप्राय घेण्यात आले होते. या प्रोग्रॅममध्ये भारतीय विद्यार्थ्यांना (Students) विदेशी संस्थांकडून क्रेडिट घेण्याची परवानगी दिली जाईल. हे क्रेडिट विदेशी संस्थेकडून ३० टक्क्यांपर्यंत घेतले जाऊ शकते. दुसरीकडे, विदेशी विद्यार्थ्यांनाही भारतीय विद्यापीठाकडून ३० टक्के क्रेडिट मिळू शकेल. या अंतर्गत भारतीय उच्च शिक्षण संस्था ही पदवी देणार आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना १ ते २ सेमिस्टरसाठी विदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर विदेशी संस्थांचे प्रमाणपत्र मिळणार आहे.
युजीसीच्या (UGC) अहवालानुसार, ही व्यवस्था ऑनलाइन पदवी प्रोग्रॅम आणि डिस्टंस आधारीत पदवी प्रोग्रॅममध्ये लागू होणार नाही. विदेशी पदवी अभ्यासक्रमांचा हा अभ्यास रेग्युलर क्लासरुम प्रमाणे होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्याला या तिन्ही कार्यक्रमांच्या आधारे विदेशी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्याची संधीही मिळणार आहे. या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये वैद्यकीय, कायदे, आणि कृषी पदवींचा या प्रोग्रॅममध्ये समावेश केला जाणार नाही.
हेही वाचा :