सीईटी परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन; 300 हून अधिक विद्यार्थी परीक्षेला मुकले

बोरिवलीच्या शाळेत परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन झालं असून 300 हून अधिक विद्यार्थी परीक्षेला मुकले आहेत. तांत्रिक अडचणींमुळं (Technical problem) विद्यार्थ्यांना परीक्षा देता येत नाहीय.

दरम्यान, काहींची परीक्षा सकाळी होती, तर काहींची परीक्षा दुपारच्या सत्रात होती. मात्र, सर्व्हर डाऊन  झाल्यामुळं (Technical problem) विद्यार्थ्यांची परीक्षा होऊ शकली नाहीय. या गोंधळानंतर सीईटीच्या आयुक्तांनी आपली प्रतिक्रिया देऊन विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय.

तांत्रिक अडचण दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत असून परीक्षेबाबत पालक आणि विद्यार्थ्यांनी कोणतीही काळजी करु नये. ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा होऊ शकली नाही, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्याचा आम्ही निर्णय घेतला असल्याचे सीईटीचे आयुक्त रविंद्र जगताप यांची सांगितले. दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून सर्व्हरची समस्या सुटल्यास त्यांची परीक्षा आताच होईल. तसं न झाल्यास या परीक्षा पुन्हा घेण्यात येतील, असंही जगतापांनी स्पष्ट केलं.

Smart News :


अनिल बोंडे म्हणतात, शरद पवार यांना पलटी मारण्याची सवय