सांगली : गणेश टेंगले यांची आयकर निदेशकपदी निवड

जत तालुक्यातील कुलाळवाडी येथील गणेश महादेव टेंगले यांची नुकतीच आयकर (income tax)निदेशक (अन्वेषण) म्हणून इंदोर (मध्य प्रदेश) येथे निवड झाली आहे. टेंगले यांनी दुष्काळी भागातील ग्रामीण भागातून लोकसेवा आयोग परीक्षेच्या माध्यमातून यश संपादन केले होते. आयकर निदेशक या पदावर पदोन्नती मिळविल्याने टेंगले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दुष्काळी भागातून गणेश टेंगले यांनी प्राथमिक शिक्षण कुलाळवाडी येथे घेतले. त्यानंतर दरीबडची येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. सांगली हायस्कूल व केआयटी कॉलेज कोल्हापूर येथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर चार वर्ष दिल्ली येथे यूपीएससी परीक्षेसाठी मेहनत घेतली. टेंगले यांनी जिद्द, मेहनत व चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी घातली.

अखेर २०१८ मध्ये झालेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले. त्यानंतर प्रशिक्षण कालावधीनंतर उज्जैन (मध्य प्रदेश) येथे आयकर(income tax) विभागात सहाय्यक आयुक्त या पदावर निवड झाली होती. प्रशासनातील सातत्यपूर्ण व अभ्यासपूर्ण कामकाज सुरू होते. सहाय्यक आयुक्त म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले होते. नुकतेच त्यांची इंदोर येथे आयकर निदेशक या पदावर पदोन्नती मिळाली आहे.

हेही वाचा:


शेतकऱ्यांची अवस्था उसाच्या चिपाडासारखी

Leave a Reply

Your email address will not be published.