तुम्हीही Creative असाल तर VFX मध्ये करा करिअर

how to become a vfx artist

इतर क्षेत्रांमध्ये जशी टेक्नॉलॉजी समोर जाऊ लागली आहे तशी आता सिनेमाच्या क्षेत्रातही टेक्नॉलॉजी बरीच पुढे गेली आहे. त्यामुळे व्हिज्युअल प्रेझेंटेशनही (Visual Presentation) सिनेमांमध्ये वाढू लागलं आहे. निरनिराळ्या एडिटिंग टेक्निक्स (how to become a vfx artist) येऊ लागल्या आहेत.

त्याचबरोबर आता बाहुबली सारख्या भारतीय सिनेमामध्ये आणि हॉलिवूडमध्येही VFX (Career in VFX) कघी वापर वाढू लागला आहे. एखादी गोष्ट खरी नसेल तरी ती खरीखुरी वाटेल असं चित्र दाखवण्याचं काम VFX (how to become a vfx artist) मुले शक्य होतं. वाढत्या डिमांड सोबतच या क्षेत्रात करिअरच्या संधीही (Career in VFX) वाढू लागल्या आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला यामध्ये करिअर (How to learn VFX) कसं करायचं याबद्दल सांगणार आहोत.

VFX क्षेत्रात करिअर बनण्यासाठी उमेदवार कोणत्याही प्रवाहातून 12वी उत्तीर्ण असावा. त्यानंतर VFX मध्ये सर्टिफिकेट, डिग्री आणि डिप्लोमा सारखे कोर्स करता येतात. सर्टिफिकेट कोर्सचा कालावधी 3 ते 6 महिने आणि डिप्लोमा कोर्स 12 ते 15 महिने आणि बॅचलर डिग्री 3 वर्षे आणि मास्टर डिग्री 2 वर्षे आहे. या अभ्यासक्रमांचे शुल्क वार्षिक 70 हजार ते 1 लाखांपर्यंत आहे.

VFX मध्ये तुम्ही डिप्लोमा ते पदवीपर्यंत विविध अभ्यासक्रम करू शकता. येथे डिप्लोमा इन व्हीएफएक्स, डिप्लोमा इन थ्रीडी अॅनिमेशन आणि व्हीएफएक्स, बॅचलर इन व्हिज्युअल आर्ट्स, मास्टर इन व्हिज्युअल आर्ट्स, बीएससी अॅनिमेशन आणि व्हीएफएक्स, एमएससी अॅनिमेशन आणि व्हीएफएक्स, बीएससी अॅनिमेशन, गेमिंग व्हीएफएक्स, अॅडव्हान्स प्रोग्रॅम इन व्हीएफएक्स, व्हीएफएक्स प्लस, व्हीएफएक्स इन मॅकिंग. इत्यादी अभ्यासक्रम चालवले जातात.

या अभ्यासक्रमांदरम्यान तुम्हाला अॅनिमेशन, डिझायनिंग, लाइटिंग, मॉडेलिंग, लाईफ ड्रॉईंग, व्हिज्युअल इफेक्ट्स, लेयरिंग, रेंडरिंग इत्यादी विषयांची माहिती दिली जाते. या क्षेत्रात एंट्री लेव्हलवर तुम्हाला 20 ते 30 हजारांपर्यंत पगार मिळेल. अनुभवासोबतच तुमचा पगारही वाढतो. चांगला अनुभव आल्यानंतर तुम्हाला 70 हजार ते 1 लाखांपर्यंत पगार सहज मिळू शकतो.


हेही वाचा :


BJP सत्तेत न येणं ही काळाची गरज…


राखी सावंतचा ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल


जियो ग्राहकांसाठी खुशखबर !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *