दरवर्षी सैन्यात दीड लाख तरुणांची होणार भरती

सैन्यदलात सेवा (recruitment) करण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरुणाईसाठी केंद्र सरकारनं एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. सरकारनं टूर ऑफ ट्युटी (Tour Of Duty) सिस्टमची घोषणा केलीय. त्याला ‘अग्निपथ’ असं नाव दिलंय. या नव्या व्यवस्थेअतर्गंत सैन्यदलात भरती होणाऱ्या युवकांना ‘अग्निवीर’ या नावानं ओळखलं जाणार आहे.

अग्निपथ योजनेअंतर्गंत (Agneepath Scheme) सैन्यदलात सैनिकांची भरती (recruitment)चार वर्षांपर्यंत होणार आहे. चार वर्षांनंतर त्या जवानांना १० लाख रुपये मिळणार आहेत. अग्निवीरांना त्यांच्या कार्यकाळानंतर प्रशस्तीपत्रक व डिप्लोमा देण्यात येईल. या नव्या व्यवस्थेनुसार भू-दल, वायू- दल आणि नौदलात प्रत्येक वर्षी 45,000 ते 50,000 जणांची अधिकारी पदाच्या खाली नियुक्ती करण्याची योजना आहे. याच पार्श्वभूमीवर लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बीएस राजू (Lieutenant General BS Raju) यांनी देखील आपली प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, अग्निपथ योजनेमुळं आगामी काळात लष्करीची ताकद वाढणार आहे. सरकारच्या या योजनेनुसार 2030-32 पर्यंत 12 लाख लष्करी जवानांपैकी निम्मे ‘अग्नवीर’ असतील. या योजनेंतर्गत भरती झालेल्या तरुणांना ‘अग्निवीर’ असं नाव देण्यात आलंय.

टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना लेफ्टनंट जनरल बीएस राजू पुढं म्हणाले, ‘या योजनेअंतर्गत दरवर्षी भरतीची संख्या वाढवली जाईल. यावर्षी 40 हजार तरुणांचा यात समावेश होणार आहे. सातव्या आणि आठव्या वर्षापर्यंत त्याची संख्या 1.2 लाखांपर्यंत पोहोचेल. तर, दहाव्या आणि अकराव्या वर्षी ही संख्या 1.6 लाखांवर पोहोचेल.’ या योजनेअंतर्गत यंदा हवाई दल आणि नौदलात 3000 अग्निवीरांची भरती करण्यात येणार आहे. मात्र, वर्षानुवर्षे भरतीचं प्रमाण वाढणार आहे. अग्निवीरांच्या प्रत्येक तुकडीतील केवळ 25 टक्के चांगल्या सैनिकांना पुढील 15 वर्षांसाठी नियमित केडरमध्ये सामील करून घेतलं जाईल. तर, उर्वरित 75 टक्के चार वर्षांनंतर काढले जातील.

लष्कराचं सरासरी वय वाढेल
लष्कर उपप्रमुख बीएस राजू यांच्या मते, या योजनेमुळं लष्कराचा फिटनेस वाढणार आहे. सध्या लष्करात सरासरी वय 32 वर्षे आहे. परंतु, अग्निवीरांच्या भरतीनंतर 6-7 वर्षांनी हे सरासरी वय 24-26 वर्षांपर्यंत खाली येईल. या योजनेतून भरती झाल्यानंतर तरुणांचा सैन्यातील उत्साह आणि जोश कमी होऊ शकतो, असा दावा काही तज्ज्ञ करत आहेत. कारण, त्यांची भरती केवळ चार वर्षांसाठी असणार आहे. देशात बेरोजगारी वाढू शकते, असंही काही लोक म्हणत आहेत. किंबहुना, दर चार वर्षांनी सुमारे ७५ टक्के तरुणांना कामावरून कमी केलं जाईल. मात्र, बीएस राजू या दाव्यांचं खंडन करतात.

हेही वाचा:


IPL च्या नव्या पर्वाचा Disney+ Hotstarला फटका

Leave a Reply

Your email address will not be published.