कर्नाटकचा दहावीचा निकाल ८५.६३ टक्के, यंदाही मुलींची बाजी!

result

कर्नाटक राज्यातून यंदा दहावीच्या परीक्षेला ८ लाख ७३ हजार विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ७ लाख ३० हजार ८८१ विद्यार्थी दहावी परीक्षा उत्तीर्ण(result) झाले. दरवर्षीप्रमाणे दहावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली असून त्यांचा निकाल ९०.२९ टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. तर मुलांचा ८१.३ टक्के इतका निकाल लागला आहे. यंदाही मुले दहावी निकालात पिछाडीवर राहिली आहेत. यंदा १० टक्के ग्रेस मार्क मिळाल्यामुळे बेळगाव व चिकोडी शैक्षणिक जिल्ह्याचा निकाल ए ग्रेडमध्ये आला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील दहा विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण(result) मिळवलेले आहेत. सौंदत्ती तालुक्यातील सहना महांतेश रायर या विद्यार्थिनिने दहावी परीक्षेत ६२५ पैकी ६२५ गुण मिळवले आहेत. तिच्या वडिलांचे गावांमध्ये किराना मालाचे दुकान आहे. ती कर्नाटक पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी असून पैकीच्या पैकी गुण मिळाल्याने तिच्या आई-वडिलांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.

हेही वाचा :


आयजीएममध्ये दाखल केलेला रूग्ण पोष्ट कार्यालय परिसरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *