NCERT चा मोठा निर्णय; बारावीच्या अभ्यासक्रमातून ‘गुजरात दंगली’चा विषय हटवला!

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार, ncert नं 12 वीच्या अभ्यासक्रमातून गुजरात दंगलीशी संबंधित मजकूर काढून टाकलाय. आत्तापर्यंत बारावीच्या राज्यशास्त्र विषयाच्या पुस्तकात हे मजकूर पान क्र. १८७ ते १८९ वर होते. या संदर्भात एनसीईआरटीनं गुरुवारी एक नोटिसही जारी केलीय.
खरं तर, NCERT नं कोरोना (Coronavirus) महामारीच्या पार्श्वभूमीवर पाठ्यपुस्तक तर्कशुद्धीकरण योजनेअंतर्गत इयत्ता 12 वीच्या अभ्यासक्रमात सुधारणा करून हा निर्णय घेतलाय. या संदर्भात एनसीईआरटीनं गुरुवारी एक नोटीस जारी केलीय. त्यानुसार या वर्षाच्या सुरुवातीला CBSE च्या 2022-23 शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत काढून टाकलेली सामग्री आता अभ्यासक्रमात असणार नाहीय.
अभ्यासक्रमात नेमकं काय होतं?
इंडियन एक्स्प्रेसनं द्वारे 12 वीच्या राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात केलेल्या सुधारणांबाबत एक अहवाल प्रकाशित केलाय. ज्याच्या अनुषंगानं गुजरात दंगलीच्या मजकुरावरून सरकारी यंत्रणाही जातीय भावनांबाबत संवेदनशील झाल्याचं दिसून येतंय. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं विधानही मजकुरातून काढून टाकण्यात आलंय. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना संदेश आहे की, त्यांनी ‘राजधर्म’ पाळावा. राज्यकर्त्यानं आपल्या प्रजेमध्ये जात, पंथ आणि धर्माच्या आधारावर भेदभाव करू नये, असं त्यांनी म्हटलं होतं.
‘हा’ मजकूर काढून टाकला
द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, नं 12 वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातून गुजरात दंगली, तसेच इतर विषय काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय. ज्यामध्ये नक्षलवादी चळवळीचा इतिहास आणि आणीबाणीच्या काळातील वादग्रस्त विषयांचा समावेश करण्यात आला आहे. पुस्तकात पान क्रमांक १०५ मध्ये “नक्षलवादी चळवळीचा इतिहास” आणि पान क्रमांक ११३-११७ मध्ये “आपत्कालीन काळात वाद” समाविष्ट आहे. एनसीईआरटीनं आपल्या नोटिसीत म्हटलंय की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांवरील विषयाचा भार कमी करणं अत्यावश्यक आहे. त्याच हेतूनं विषय काढून टाकण्यात आले आहेत.
हेही वाचा :