खूशखबर! राज्यात ७,२३१ पोलिसांची होणार भरती

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील तरुणांसाठी एक खूशखबर दिली आहे. नव्या पोलीस भरतीची घोषणा त्यांनी केली असून त्यानुसार ७,२३१ पोलिसांच्या जागा (recruitment) भरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विधानसभेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिलं. यावेळी त्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीबद्दल माहिती दिली. वळसे म्हणाले, सोशल मीडियातून सातत्यानं विचारलं जात आहे की, पोलीस भरती कधी करणार? या निमित्तानं मी सांगू इच्छितो की, २०१९ रोजी रिक्त असलेल्या पोलीस शिपाईपदाच्या ५,२९७ पदांची भरती (recruitment) प्रक्रिया पूर्ण झालेली आहे याच्या नेमणूका देणं बाकी आहे.
पण येत्या काही काळात ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. पण यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात ७,२३१ पोलिसांची भरती करण्यात येईल. याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ती भरती करत असताना यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. यानंतर पुढील दोन वर्षात जी भरती होईल, त्याचा प्रस्तावही आम्ही मंत्रिमंडळात मांडणार आहोत. त्यालाही मंजुरी मिळाली तर अनेक तरुणांना रोजगाराची संधी मिळेल.
पोलीस सेवेत दाखल झालेला जो शिपाई आहे. त्याला पोलीस उपनिरिक्षणकाची संधी मिळायची कधी मिळत नव्हतं. तीस वर्षे सेवा झालेला शिपाई हा शिपाई म्हणूनच निवृत्त होतो. पण आता यामध्ये आम्ही कालबद्ध पदोन्नती देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यानुसार, तीस वर्षांनंतर प्रत्येक कॉन्स्टेबल हा निवृत्त होताना सब इन्स्पेक्टर झालेला असेल. निवृत्त होताना त्याला सब इन्स्पेक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळेल.
हेही वाचा :