व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया एकसारखी हवी

Smart News:- व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया एकसारखी हवी

Smart News:- राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या (Vocational Courses) प्रवेशासाठी (Admission) एकसारखी प्रवेश अथवा समुपदेशन प्रक्रिया राबविण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. नुकतेच औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनाला यासंबंधी १५ दिवसांत निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे. सरकारनेही आता यासंबंधी जलद हालचाली कराव्यात, अशी मागणी शिक्षण संस्थांच्या वतीने केली आहे.

अभियांत्रिकी, कृषी, औषधनिर्माण असो की वैद्यकीय प्रवेश, प्रत्येकासाठी प्रवेश प्रक्रिया वेगवेगळी राबविली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पसंतीच्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया उशिरा असल्यास निर्णय घेण्यास अडचणी निर्माण होतात. याचीच दखल घेत असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट ऑफ अन ऐडेड इन्स्टिट्यूट इन रूरल एरिया ही संस्था राज्य सरकारशी मागील तीन वर्षांपासून चर्चा करत आहे.

शासनास सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया एकसारखी करण्याबाबत निवेदन दिलेले होते. परंतु, मागील तीन वर्षांपासून शासनाने याबाबत कुठलाही ठोस निर्णय न घेतल्यामुळे विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांचे नुकसान होत होते. खंडपीठाने शासनाला सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत संघटनेने दिलेल्या वरील सर्व पत्राचा विचार करून १५ दिवसाच्या आत निर्णय घेण्यास सांगितले आहे. व शासनाने घेतलेला निर्णय संघटनेला सात दिवसांच्या आत कळविण्यास सांगितलेला आहे.

अशा आहेत मागण्या..

– सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश फेरी एकाच वेळेस समुपदेशक फेरी सह राबविण्यात यावी.

– पदविका व पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची अंतिम तारीख, तसेच बारावीनंतरच्या सर्व अभ्यासक्रमांची प्रवेशाची अंतिम तारीख एकच असावी.

– बारावीनंतरच्या सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या अंतिम गुणवत्ता यादी तयार झाल्यानंतरचे प्रवेश प्रक्रियेतील सर्व टप्पे एकाच वेळी घ्यावेत

– इतर राज्यांप्रमाणे अंतिम फेरीत सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी राबविवी.

आकडे बोलतात..

– राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटींची संख्या ः १५

– २ मे २०२२ पर्यंत नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या – १० लाख ८१ हजार ३६०

– बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणारे विद्यार्थी – सरासरी १२ टक्के

Smart News:-

‘मला कुणी समजून घेत नाही. ‘ म्हणत 14 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या


Aashram 3 Trailer: ईशा गुप्ताने 6 सीनमध्ये ओलांडल्या सर्व मर्यादा!


Elon Musk यांच्याकडून Twitter खरेदीला तुर्तास स्थगिती?


आता कशी असेल राज ठाकरे यांची सुरक्षा? ठाकरे सरकारचा मोठा निर्णय!


शिरोळ: कुरुंदवाडमध्ये चित्ररथ यात्रेचे जल्लोषी स्वागत!

Leave a Reply

Your email address will not be published.