पुणे विद्यापीठाचा १२० वा पदवीप्रदान सोहळा गुरूवारी होणार

Smart News:-पुणे विद्यापीठाचा १२० वा पदवीप्रदान सोहळा गुरूवारी होणार

Smart News:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा यंदाचा पदवीप्रदान समारंभ येत्या गुरुवारी (ता.१२) सायंकाळी पाच वाजता विद्यापीठाच्या मागील बाजूस असणाऱ्या हिरवळीवर होणार आहे. या कार्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमात राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेचे (नॅक) अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली.

२०२१ या शैक्षणिक वर्षातील पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका, पीएच.डी, एम.फील अशा स्तरावरील एकूण एक लाख १८ हजार २२२ विद्यार्थ्यांना पोस्टाद्वारे पदवी प्रमाणपत्र पाठविण्यात येणार आहेत. यामध्ये ३०९ ‘पीएच.डी’धारक आहेत. पदवी प्रदान सोहळ्यात ७५ विद्यार्थ्यांना व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार आहे.

 

Smart News:-

आरोग्य भरती परीक्षांबाबत टोपेंचे महत्त्वाचे विधान; म्हणाले…


49 रुपयांत 180 दिवसांचा रिचार्ज; ‘या’ टेलिकॉम कंपनीचा प्लॅन पहाच.


”संतांपुढे नतमस्तक झाले तर, त्यात..”; राज ठाकरेंना सावंतांचा टोला


‘कहानी घर घर की’च्या साक्षीनं का केलं नाही लग्न?: पार्वतीची भूमिका केली लोकप्रिय


अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, कोल्डड्रिंकमधून गुंगीचे औषध देत बलात्कार

Leave a Reply

Your email address will not be published.