सर्व विद्यापीठांच्या परीक्षांबाबत हाय कोर्टाचे महत्त्वपूर्ण आदेश

Smart News:- राज्यातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! सर्व विद्यापीठांच्या परीक्षांबाबत हाय कोर्टाचे महत्त्वपूर्ण आदेश

Smart News:- गेल्या काही दिवसांपासून राज्यातही कोरोना पूर्णपणे नाहीसा झाला आहे असं चित्रं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये कॉलेजेसही ऑफलाईन पद्धतीनं सुरु झाले आहेत. मात्र गेली दोन वर्ष ऑनलाईन शिक्षण घेतल्यामुळे ऑफलाईन परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध होता. मात्र राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे.

उच्च शिक्षणमंत्री आणि कुलगुरू यांच्या बैठकीच्या आधीच नागपूर विद्यापीठानं ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेऊन परीक्षांचा (exam) आढावा घेतला होता. त्यात त्यांनी सर्व विद्यापीठांमध्ये ऑफलाइन परीक्षा घेण्याबाबत सूचना केली होती. मात्र या निर्णयाला अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही कोणत्याही विद्यापीठाकडून याबाबत ठोस निर्णय झाला नव्हता. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात होते.

लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव सुटला. तसंच ऑनलाईन अभ्यासही योग्यप्रकारे होऊ शकला नाही. परीक्षेत कोरोना संसर्गाचा धोका विद्यार्थ्यांना वाटत होता. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. त्यासाठी निरनिराळ्या विद्यापीठतच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनही केलं होतं. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर काही दिवसांपूर्वी नागपूर, गोंडवाना आणि लातूर विद्यापीठांनी MCQ सह ऑफलाईन परीक्षा घेण्याचं निश्चित केलं होतं. इतर कोणत्याही विद्यापीठांचा अशा पद्धतीनं परीक्षा घेण्याबाबत निर्णय आला नाहीये.

काही विद्यापीठांनी लेखी परीक्षा घेण्याचाही निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे राज्यातील निरनिराळ्या विद्यापीठांच्या परीक्षा निरनिराळ्या पद्धतीनं होतील. तसंच परीक्षांचे निकालही निरनिराळ्या पद्धतीनं लागतील. हे विद्यार्थ्यांसाठी बरोबर नाही हे कोर्टाच्या लक्षात आलं आहे. म्हणूनच राज्यातील सर्व विद्यापीठांनी सर्व परीक्षा सर्व पद्धतीनंच घ्याव्यात असा निकाल आज उच्च न्यायालयानं दिला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर होऊन एकमतानं आणि एकाच पद्धतीनं परीक्षा होणार आहेत.

Smart News:-

एसटीची पहिली इलेक्ट्रिक बस ‘शिवाई’ 1 जूनपासून धावणार


भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्यावर शाईफेक!


प्रधानमंत्री मातृवंदन योजनेत रत्नागिरी जिल्हा अव्वल स्थानी


कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या पाठिशी सरकार…


फ्रेंच ओपन टेनिस : कोको गॉफ उपांत्यपूर्व फेरीत

Leave a Reply

Your email address will not be published.