पाठ्यपुस्तकांच्या वितरणाला गती मिळण्यासाठी कार्यवाहीचे ‘दिनकर टेमकरांचे’ आदेश

Smart News:- राज्यातील शाळांमध्ये लाखो विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळावीत, यासाठी शिक्षण विभाग स्तरावरून वेगाने पावले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तालुका स्तरावरून शाळा स्तरावर पाठ्यपुस्तके वेळेत पोचवावीत आणि शाळेमार्फत विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण करावे, याबाबत कार्यवाहीचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या हाती शाळेच्या पहिल्या दिवशीच मोफत पाठ्यपुस्तके असतील, अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मागील आठवड्यात मुंबईतून सुरू झालेल्या पाठ्यपुस्तकांच्या वितरण प्रसंगाच्या निमित्ताने दिली होती. त्या अनुषंगाने पाठ्यपुस्तके वेळेत शाळापर्यंत पोचविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार, समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजनेत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी बालभारती भांडार ते तालुका, मनपा स्तरापर्यंत पाठ्यपुस्तकांची वाहतूक दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्यात यावी, असे टेमकर यांनी परिपत्रकात नमूद केले आहे. राज्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत यावर्षी तब्बल पाच कोटी ४० लाख ९० हजार ७०६ मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे.
Smart News:-
राज्यात कुठेच भारनियमन नाही, यापुढेही होणार नाही- ऊर्जा मंत्री नितीन राऊत
किव्हमधील भारतीय दूतावास पुन्हा सुरु होणार : परराष्ट्र मंत्रालय
राहुल भट यांच्या हत्येच्या निषेधार्थ 350 काश्मिरी पंडितांनी राज्यपालांकडे पाठवले सामूहिक राजीनामे
डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या ‘सुवर्ण पालवी’ प्रदर्शनाचे उद्घाटन
छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंधेला ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ चित्रपटाची घोषणा