दहावी, बारावीचा निकाल जूनमध्येच जाहीर होणार!

बारावीचा निकाल (result) जूनच्या दुसर्या आठवड्यात म्हणजेच 10 जूनपर्यंत, तर दहावीचा निकाल जूनच्या तिसर्या आठवड्यात म्हणजेच 20 जूनपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील अधिकार्यांनी ही माहिती दिली.
राज्य मंडळाने यंदा परीक्षा घेण्यावर ठाम राहत दहावी, बारावीच्या परीक्षा घेतल्या. काही तांत्रिक कारणांमुळे परीक्षांच्या वेळापत्रकात बदलदेखील करावे लागले.
त्यामुळे दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल, तर बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिलदरम्यान पार पडली. परीक्षेनंतर उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रियाही सुरू झाली असून, काही विषयांची उत्तरपत्रिका तपासणी अंतिम टप्प्यात आहे.(result)
हेही वाचा :