शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी..!

यूजीसी चार वर्षांचा नवा पदवी अभ्यासक्रम सुरु करणार आहे. पीएचडी अभ्यासक्रमात (phd course) सुद्धा सुधारणा करणार आहे. 10 मार्च रोजी यूजीसीच्या झालेल्या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या सुधारणांबाबत चर्चा झाली आहे.
यामध्ये चार वर्षांच्या पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी पीएचडी (phd course) प्रवेशासाठी पात्र ठरु शकेल, अशा प्रकारच्या सुधारणा करण्याचा विचार यूजीसीने केला आहे. हा नवा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम तयार करताना सुद्धा विद्यार्थ्यांना मल्टी एन्ट्री आणि एक्झिट पॉईंट असतील.
म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याने चार वर्षे अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि मध्येच त्यांनी अभ्यासक्रम सोडला तर त्याला सोडलेल्या वर्षापासून पुन्हा या अभ्यासक्रमात प्रवेश मिळू शकेल आणि पुढे हा अभ्यासक्रम पूर्ण करु शकतो.
नवीन पदवी अभ्यासक्रम कसा असेल?
– यूजीसी 4 वर्षाचा नवा पदवी अभ्यासक्रम
– विद्यार्थ्याने 1 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास त्याला निवडलेल्या अभ्यासक्रमाचं प्रमाणपत्र मिळेल
– विद्यार्थ्यांने दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास विद्यार्थ्याचा डिप्लोमा पूर्ण होईल
– अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांने तीन वर्ष पूर्ण केल्यास त्याला बॅचलर डिग्री मिळेल
– अभ्यासक्रमात विद्यार्थ्याने 4 वर्ष पूर्ण केल्यास त्याला चार वर्षाची बॅचलर डिग्री मिळेल
– 4 वर्ष पूर्ण अभ्यासक्रम झालेला विद्यार्थी पीएचडी प्रवेशासाठी पात्र असेल
हेही वाचा :